On Friday, Chief Minister Eknath Shinde cleared the way with a successful discussion regarding the agitation going on by the Kisan Sabha for the last five days for the major demand that the name of the farmer should be given on the seven-twelve slopes of tribal forest land. esakal
नाशिक

Nashik Adivasi Morcha : ‘लाल वादळा’च्या आंदोलनाचा तिढा संपला; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा

Adivasi Morcha : सोमवार (ता. २६) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलेल्या ‘लाल वादळा’च्या आंदोलनाचा तिढा अखेर मुख्यमंत्र्यांनी सोडविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Adivasi Morcha : वनजमिनीच्या प्रमुख मागणीसह एकूण १८ मागण्यांसाठी सोमवार (ता. २६) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलेल्या ‘लाल वादळा’च्या आंदोलनाचा तिढा अखेर मुख्यमंत्र्यांनी सोडविला आहे. शुक्रवारी (ता. १) सायंकाळी आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत मुंबईत चर्चा करून त्यांनी मांडलेल्या मागण्या पुढील तीन महिन्यांत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. (Nashik Adivasi Morcha agitation ends on friday marathi news)

मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेचे लेखी इतिवृत्त हाती आल्यानंतर ‘लाल वादळाचा’ येथील मुक्काम उठणार आहे. वनहक्क दाव्याअंतर्गत कसणाऱ्याचे नाव सातबारा उताऱ्यावर लावण्यात यावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांनी सोमवारपासून (ता. २६) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे.

या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी (ता. १) शिष्टमंडळाला चर्चेसाठी मुंबईत पाचारण केले. मंत्रालयात सायंकाळी झालेल्या या बैठकीला पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह शिष्टमंडळाचे प्रमुख माजी आमदार जे. पी. गावित, डॉ. डी. एल. कराड, इरफान शेख, रमेश चौधरी, बेबीबाई गवळी, मंदाकिनी भोये आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आदिवासी शेतकऱ्यांबाबत यापूर्वी झालेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करताना शक्य तेथे पोटखराबा जमिनीची उत्पादन योग्य क्षेत्रात नोंदणी करून घ्यावी, तीन महिन्यांमध्ये त्यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. (latest marathi news)

कांदा निर्यातबंदी उठविण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून, आठ दिवसांत योग्य तो निर्णय होईल, असे शिंदे यांनी सांगितले. याशिवाय अंगणवाडीसेविका, आशा वर्कस यांच्या मागण्यांबाबत योग्य ती भूमिका घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

इतिवृत्त आज मिळणार

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त शनिवारी (ता. २) सकाळपर्यंत शिष्टमंडळाला दिले जाणार आहे. या इतिवृत्तानंतरच आंदोलन कायम ठेवायचे की माघारी फिरायचे, याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा रात्रीचा मुक्काम वाढला आहे.

''आंदोलकांशी सकारात्मक चर्चा झाली असून, चर्चेतील इतिवृत्त तयार करून उद्या सकाळी आंदोलकांना देण्यात येणार आहे. आंदोलक व मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.''- जलज शर्मा, जिल्हाधिकारी नाशिक

''मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीचे इतिवृत्त शनिवारी (ता. २) हाती येईल. या इतिवृत्तातील व बैठकीतील मुद्दे सारखेच आहेत का, हे तपासून मगच आंदोलनाचा पुढील निर्णय घेण्यात येईल.''- जे. पी. गावित, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT