PM Narendra Modi in Nashik esakal
नाशिक

PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी प्रशासन ‘अलर्ट’! एक हजाराहुन अधिक पोलिसांचा बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजे पाच वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पिंपळगावला सभा घेण्याच्या निमित्ताने येत आहे. दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांची सभा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा ‘अलर्ट’ मोडवर आली आहे. (Nashik Prime Minister Narendra)

पाच वर्षांपूर्वी बाजार समितीच्याच प्रांगणात झालेल्या सभेत मोदी यांनी स्पर्श केलेल्या मुद्द्यांना उजाळा दिला जात आहे. त्याचबरोबरच बुधवारी (ता. १५) होणाऱ्या सभेत मोदी कोणत्या मुद्‍द्यांना स्पर्श करणार, याचीही उत्सुकता आहे. शेतकऱ्यांचा विरोध शमविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. महाविकास आघाडी व महायुतीकडून आपापले मुद्दे प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहचविण्याची चढाओढ सुरू आहे. त्यातच आता भाजपने हुकमी एक्का रणांगणात उतरविला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला संबोधीत करणार आहेत. (latest marathi news)

तगडा पोलिस बंदोबस्त...

पंतप्रधान मोदी यांच्या सभेला तगाडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एक हजाराहुन अधिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जोपूळ रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा असल्याने या परिसराला पोलिसांचे कवच निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आहे. बंदोबस्ताचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

सभास्थळी दोन दिवस अगोदरपासून पोलिसांचा गराडा पडला आहे. वेगवगळे झोन तयार करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था बदलण्यात येत आहे. हेलीपॅड, पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय सुरक्षा पथक, राज्य राखीव दल, केंद्रीय सुरक्षा बल, गृह रक्षक दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT