admission esakal
नाशिक

Nashik Educational News : ‘नॉन कॅप’ द्वारे प्रवेश संधी उपलब्‍ध; अभियांत्रिकी, एमबीए, आर्किटेक्‍चर अभ्यासक्रमांचा समावेश

Nashik Educational : व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची मुदत पूर्ण झालेली असतानादेखील आणखी एक प्रवेश संधी उपलब्‍ध झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची मुदत पूर्ण झालेली असतानादेखील आणखी एक प्रवेश संधी उपलब्‍ध झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये अभियांत्रिकी, आर्किटेक्‍चरच्‍या पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांसह एमबीए अभ्यासक्रमाला पात्रताधारक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. ‘नॉन कॅप’च्‍या जागांसाठी प्रवेश दिले जाणार आहेत. या संदर्भात सीईटी सेलने मंगळवारी (ता.१) परिपत्रक जारी केले आहे. (Admission opportunities available through Non Cap of Engineering MBA and Architecture courses )

परिपत्रकात नमूद केल्‍यानुसार सर्वोच्च न्‍यायालयात दाखल याचिकेतील आदेशानुसार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद या शिखर संस्‍थेद्वारे सुधारित वेळापत्रक घोषित केले होते. याअंतर्गत रिक्‍त जागांवर प्रवेशासाठी २३ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत दिलेली आहे. तसेच वास्‍तुकला परिषदेने ३० सप्‍टेंबरला जारी केलेल्‍या सुधारित वेळापत्रकानुसार संलग्‍न अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी २१ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत दिलेली आहे.

या पत्राचा संदर्भ लक्षात घेता, विविध व्‍यावसायिक पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्‍या शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित तत्त्वावरील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्‍या रिक्‍त जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. ‘नॉन कॅप’ नोंदणी प्रक्रिया राबविताना हे प्रवेश घेता येतील. (latest marathi news)

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक

पदव्‍युत्तर पदवी स्‍तरावरील अभियांत्रिकी (एमई/एम.टेक), एमबीए अभ्यासक्रमांना २३ पर्यंत प्रवेश मुदत असेल. तर पदवी स्‍तरावरील अभियांत्रिकी (बीई/बी.टेक), थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीसाठीदेखील २३ पर्यंत प्रवेश दिले जातील. वास्‍तुकला शाखेतील पदवी (बी.आर्क) आणि पदव्‍युत्तर पदवी (एम.आर्क.) साठीही २३ ऑक्‍टोबरपर्यंत प्रवेश मुदत असेल.

अशी आहे प्रवेश प्रक्रिया..

नॉन कॅप जागांसाठी रोजच्‍या रोज प्रवेश संधी उपलब्‍ध असेल. प्रवेशाच्‍या अंतिम दिनाकांपर्यंत रोज दुपारी एकपर्यंत ऑनलाइन नोंदणी मुदत असेल. कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्‍चितीची दुपारी तीनपर्यंत मुदत असेल. कागदपत्र पडताळणीसाठी ई-स्‍क्रुटीनी, प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनीचे पर्याय उपलब्‍ध असतील. नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संबंधित संस्‍थेत स्‍वतंत्रपणे अर्ज करणे आवश्‍यक आहे. प्राप्त अर्जांनुसार गुणवत्ता यादी, संस्‍था पातळीवर तयार केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT