नाशिक : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरीला मंगळवार (ता.१) पासून सुरुवात झाली. शनिवार (ता.५) पर्यंत रोजच प्राप्त अर्जांनुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सद्यःस्थितीत १० हजार ५४८ जागा रिक्त आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. यापूर्वी तीन नियमित फेऱ्या व सहा विशेष फेऱ्यांचे आयोजन केले होते. (Admission opportunities with merit list daily starting from 11th daily rounds till Saturday )
यानंतरही जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश संधी शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार मंगळवार (ता.१) पासून दैनंदिन गुणवत्ता फेरीचे आयोजन केले आहे. याअंतर्गत शनिवार (ता.५) पर्यंत रोजच गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. दैनंदिनरित्या सकाळी आठपर्यंत नोंदणीची मुदत असेल. तर सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत प्रवेश निश्चितीची मुदत असेल. पुढील दिवसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सायंकाळी सहापासून सुरु होईल. (latest marathi news)
शेवटच्या दोन फेऱ्यांना चांगला प्रतिसाद
पाचव्या व सहाव्या विशेष फेरीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग कमी राहिला होता. मात्र गुणवत्ता यादीमध्ये निवड झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. पाचव्या फेरीत ४२९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असता, ३६४ विद्यार्थ्यांची यादीत निवड झाली होती. यापैकी ३१७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. सहाव्या विशेष फेरीत २९४ विद्यार्थी सहभागी झाले असता, २५६ विद्यार्थ्यांची निवड केली. यापैकी २३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.
अकरावीची प्रवेश क्षमता- २८ हजार ५२०
प्रवेशासाठी नोंदणी केलेले विद्यार्थी- २४ हजार ७००
प्रवेश घेतलेले विद्यार्थी- १७ हजार ९७२
रिक्त असलेल्या जागा- १० हजार ५४८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.