admission esakal
नाशिक

Nashik News : फार्मास्युटिकल मेडिसीन, हेल्थकेअर अॅडमिनीस्ट्रेशन, पब्लिक हेल्थला प्रवेश सुरू; 20 मेपर्यंत मुदत

Nashik : विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. त्‍यानुसार एम.एस्सी. इन फार्मास्युटिकल मेडिसीन, हेल्थ केअर अॅडमिनीस्ट्रेशन आणि मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशन) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २० मेपर्यंत अर्ज सादर करता येतील. ( Admission start for Pharmaceutical Medicine Healthcare Administration Public Health )

महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर म्‍हणाल्‍या, की आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे तसेच मास्टर ऑफ सायन्स ड्रग सायन्सेस औषधांचा शोध, विकास सुरक्षितता पैलूंच्या क्षेत्रात सैद्धांतिक आणि व्यावहारिक कौशल्ये प्रदान करते. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात नव्याने संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठातर्फे सार्वजनिक आरोग्य पोषणशास्त्र, आरोग्य सेवा व्यवस्थापन व औषधनिर्मिती क्षेत्रातील नावीन्यपूर्ण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे.

प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ म्‍हणाले, की मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, हेल्थकेअर मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, मीडिया मॅनेजमेंट, रुरल मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, डिजिटल मॅनेजमेंट, तसेच पोषणविषयक विशिष्ट कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन, प्रत्यक्ष कृती आणि करण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन अशा सर्व व्यवस्थापकीय कौशल्यांचे ज्ञान मिळते..(latest marathi news)

हा अभ्यासक्रम वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी २० मेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. अभ्यासक्रमांच्‍या केंद्रीय सामायिक परीक्षेबाबतची माहिती विद्यापीठच्या संकेतस्थळावर उपलब्‍ध केली जाईल.

अशी आहे पात्रतेची अट

अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आरोग्य विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे पदवी, पदविका परीक्षा उत्तीर्ण, बी.एस्सी. नर्सिंग व अनुषंगिक अभ्यासक्रमाचे पदवीधर प्रवेश घेऊ शकतात. एम.एस्सी. फार्मास्युटिकल मेडिसीन अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे पदवीधर विद्यार्थी, तसेच बी.एस्सी., बी.फार्मसी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशास पात्र आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT