Nashik News : लव्ह जिहादचे संकट आता तुमच्या-आमच्या घरापर्यंत पोचले आहे. लव्ह जिहाद म्हणजे प्रेम नसून केवळ प्रेमाच्या जाळ्यात अडकवून सक्तीचे धर्मांतर होय. यापासून हिंदू मुलींसह त्यांच्या कुटुंबीयांनी सजग राहणे आवश्यक आहे, असा सल्ला ॲड. वर्षा डहाळे यांनी मंगळवारी (ता.२०) दिला. (nashik Love Jihad means entrapment marathi news)
गंगा गोदावरी पुरोहित संघातर्फे सध्या गोदा जन्मोत्सव सुरू असून त्यात मंगळवारी सायंकाळी ॲड. डहाळे यांनी लव्ह जिहाद हे प्रेम नसून गुन्हाच असल्याचे ठाम प्रतिपादन केले. मीनल भोसले यांनी वक्त्यांचा परिचय दिला. व्याख्यानास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आपला धर्म वाढविण्यासाठी इतर धर्मातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते.
काही काळापूर्वी केरळमधील हिंदू मुली मोठ्या संख्येने गायब झाल्या, कालांतराने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून सक्तीचे धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचे लक्षात आल्याचे ॲड. डहाळे यांनी सांगितले. हिंदू मुलींना लव्ह जिहाद जाळ्यात ओढण्यापूर्वी संबंधित मुलींचा आर्थिक स्तर, कौटुंबिक पार्श्वभूमी प्रथम समजून घेतली जाते, त्यानंतर संबंधित मुलीची काही काळ रेकी केली जाते, तिच्या सवयी जाणून घेतल्या जातात, त्यानंतर आर्थिक स्तरावर आमिष दाखवून तिला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे सक्तीने धर्मांतर केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, काळाराम मंदिराचे विश्वस्त धनंजय पुजारी, अलोक गायधनी आदी उपस्थित होते. पुरोहित संघाचे प्रतीक शुक्ल यांनी आभार मानले.
आई अन् मुलगी एकाच्याच प्रेमात
लव्ह जिहादमध्ये फक्त सर्वसामान्य मुलीच फसतात, असे नाही तर वैद्यकीय क्षेत्र, न्यायदान करणारी महिला, आयएएसची तयारी करणारी तरुणी अशा सर्वच क्षेत्रातील मुलीही फसत चालल्याने ही गंभीर बाब झाली आहे, असे सांगून ॲड. डहाळे यांनी ३७ वर्षांची आई व तिची १७ वर्षांची मुलगी विशिष्ट समाजातील एकाच तरुणाच्या जाळ्यात अडकल्याचा किस्सा कथन केला. हिंदू मुलींनी आपले आदर्श कोणते हे प्रथम लक्षात घ्यावे, म्हणजे फसवणूक होणार नाही, असा सल्लाही त्यांनी शेवटी दिला. (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.