Nashik Heavy Rain Damage : परतीच्या पावसाने शहरात दमदार हजेरी लावल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे खड्ड्यांमधून मार्ग शोधताना वाहन चालकांची कसरत तर होतेच शिवाय, खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. (Nashik affcted due to return heavy rain)
पाच दिवसांपासून सलग पाऊस पडत असल्याने रस्त्यांची अक्षरश वाट लागली आहे. जवळपास सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचते आणि वाहन चालकांना त्याचा अचूक अंदाज येत नाही. त्यामुळे गाडी खड्ड्यात जावून अपघात होत आहेत.
दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गातही पावसाचे पाणी साचल्याने महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली. पावसाचा जोर अजूनही कायम असल्यामुळे शहरातील जनजीवन प्रभावीत झाले आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळपासूनच पावसाला सुरवात झाल्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अघोषित सुटी मिळाली.
जवळपास २० ते २५ टक्के विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. शहरात दिवसभरात १३.३ मिलीमिटर पाऊस पडला. गेल्या २४ तासांमध्ये शहरात ५० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. (latest marathi news)
शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थी संख्या घटली
शुक्रवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरवात झाल्याने सकाळसह दुपार सत्रातील शाळा व महाविद्यालयांत शाळांमध्ये सुमारे २० ते २५ टक्के विद्यार्थी गैरहजर राहिले. काही शाळांमध्ये अंतर्गत परीक्षा सुरू असल्याने तेथील विद्यार्थ्यांची संख्या शंभर टक्के राहिली. उर्वरित शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येवर परिणाम झाल्याने अघोषित सुटीचे वातावरण होते.
ठळक घडामोडी
-सकाळपासून पावसाची दमदार हजेरी
-शाळा, महाविद्यालयांत २५ टक्के विद्यार्थ्यांची अनुपस्थिती
-शहरातील सखल भागात पाणी साचले
-रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना तारांबळ
-मुख्य रस्त्यांवर दिवसभर संथगतीने वाहतूक
-भाजीपाला, फळ व हात विक्रेत्यांचे नुकसान
-सर्दी, खोकला आदी साथरोगांचा धोका वाढला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.