Kailas Raut esakal
नाशिक

Inspirational Story : अपघाताने दगा, पण इच्छाशक्तिने गाठले यशोशिखर!

किरण सूर्यवंशी

अभोणा : कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सुटलेले, त्यातच एका दुर्दैवी अपघातात उजवा पाय शरीरापासून वेगळा होतो. जीवनात सर्वत्र नैराश्य आणि अंधार असताना 'फिनिक्स' पक्षासारखा उभारी घेऊन, पुन्हा जिद्दीने एका पायावर उभा राहतो. इच्छाशक्तीच्या जोरावर वीस वर्षानंतर बारावीचे सर्व विषय घेऊन परीक्षा देतो आणि यशाला गवसनी घालतो..ही संघर्ष कथा आहे कळवण तालुक्यातील चिखलीपाडा येथील कैलास राऊतची... (Inspirational Story)

२००३-०४ मध्ये कैलासने दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अभोणा येथील डांग सेवा मंडळ संचलित कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमात 'पर्चेसिंग अँड स्टोअर किपिंग' या विषयात अकरावीसाठी प्रवेश घेतला. अकरावी, बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून २००५-०६ मध्ये परीक्षेचा फॉर्म भरला.

परंतु कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे परीक्षा देऊ न शकल्याने त्याचे शिक्षण खंडित झाले. २०१० मध्ये नांदुरी येथील पेट्रोलपंपाजवळ दुचाकीच्या अपघातामुळे उजवा पायच निखळल्याने, घरीच बसून राहण्याची वेळ आली. परिस्थिती आणि अपघातामुळे वैफल्यग्रस्त जीवन जगत असताना, पुन्हा शिक्षणाची उर्मी जागवत वयाच्या ३७ व्या वर्षी येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्यवसाय अभ्यासक्रमाकडील 'लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट' हा विषय घेऊन सर्व विषयांसह मार्च २०२४ मध्ये परीक्षा दिली. (latest marathi news)

या परीक्षेत कैलासने ६८ टक्के गुण मिळवून यशाला गवसणी घातली. देविदास थोरे, किरण सूर्यवंशी, केवळ वाघ, शरद सोनवणे, शांताराम महाले, इंदिरा ठाकरे, तुषार गवळी, सतीश गवळी, राजेंद्र अहिरे, भूषण सूर्यवंशी या शिक्षकांचे त्याला सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, उपाध्यक्ष दामोदर ठाकरे, सचिव ॲड. मृणाल जोशी व सर्व संचालक मंडळ, प्राचार्या कल्पना शिरोरे, उपमुख्याध्यापक मधुकर मोरे, पर्यवेक्षक सुनील बोवा, ज्ञानेश्वर आहेर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

"अपयशाला खचून न जाता, केवळ इच्छाशक्ती असली तर कोणत्याही संकटावर सहज मात करता येते. मला अभोणा येथील व्यवसाय अभ्यासक्रमाच्या सर्व शिक्षकांनी प्रेरणा देऊन, प्रोत्साहन दिल्यानेच मी हे यश संपादन करू शकलो." - कैलास राऊत, चिखलीपाडा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT