Blooming tomato and maize crops due to heavy rains. esakal
नाशिक

Kharif Season : पावसानंतर खरिपांच्या पिकांना जीवदान; निफाड तालुक्यात मका, सोयाबीनचे पीक बहरले

Kharif Season : दीड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात निफाड तालुक्यात सर्वदुर दमदार पाऊस बरसला.

सकाळ वृत्तसेवा

Kharif Season : दीड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात निफाड तालुक्यात सर्वदुर दमदार पाऊस बरसला. पुनरागमनात दोन दिवस संततधार पावसाने शेतीशिवार ओलेचिंब केले. यामुळे जून महिन्यात पेरलेली खरिपांची पिके आता चांगलीच बहरली आहे. पावसाने खरिपांच्या पिकांना मोठे जीवदान दिले असून, मका, सोबायीनसह निफाड तालुक्यात खरिपांची पिके बहरली आहेत. (After rain maize and soybean crops flourished in Niphad taluka)

निफाड तालुक्यात मृग नक्षत्रात पेरणी झालेली खरिपातील पिके आता डौलाने उभी आहेत. तणनाशक फवारणीसह मशागतीचे काम सुरू आहे. टोमॅटोची बहुतांश लागवड मल्चिंग पेपरवर झाल्याने तणाचा उपद्रव फारसा दिसत नाही. दीड महिना पावसाने उघडीप दिल्याने निफाड तालुक्यातील ३५ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली होती.

पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत होते. पेरणीनंतर पावसाने नुसते डोळेच वटारले नाही तर आकाश ढगाळलेले असण्याऐवजी चक्क कडक उन्ह तळपू लागले. त्यामुळे अंकुरलेल्या सोयाबीन, मका आदी पिके कोमेजू लागली होती. खरिप नगदी पिक असलेले टोमॅटो उत्पादक शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले होते.

दोन दिवस मुसळधार

शनिवार व रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने दीड महिन्याचा अनुषेश भरून काढत नदी-नाले खळखळून वाहु लागले. पाऊस अगदी वेळेवर धावून आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले. त्यामुळे माना टाकलेली पिके आता पुन्हा बहरली आहे. अद्याप पावसाने सरासरी गाठली नसल्याने अजून पावसाची आवश्‍यकता आहे.

जलस्त्रोतांना फुटला पाझर

दिंडोरी व नाशिकच्या धरणातील पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस झाल्याने धरणसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे निफाड तालुक्यातून प्रवाहीत होणाऱ्या गोदावरी व कादवा, बाणगंगा, पारशरी नदी दुथडी भरून वाहिल्या. पालखेड कालव्याचे आवर्तन सोडण्यात आले. नदी-नाल्यांचे पाणी लगतच्या जलस्त्रोतांमध्ये गेल्याने पाणीपातळी वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT