Dr. shobha Bachhav esakal
नाशिक

Dhule Lok Sabha Election : डॉ. बच्छावांच्या माहेरी पुन्हा एकदा दिवाळी! लेक आता दिल्लीला निघाल्याचा अपूर्व आनंद

Nashik News : फेरमतमोजणीनंतर शेवटी डॉ. बच्छाव यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली अन् पिंपळगावकवासियांनी अक्षरक्षः दिवाळी साजरी केली.

योगेश सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव : धुळे लोकसभा मतदारसंघाच्या अतिशय अटीतटीच्या लढतीत डॉ. सुभाष भामरे विजयाची हॅटट्रिक करतात की आपल्या माहेरवाशिणीची खासदारकीसाठी वर्णी लागते याकडे पिंपळगाववासियांचे लक्ष लागून होते. मतदानापासून सुर असलेली चर्चा अन कालचा निकालाचा दिवस आली तशी वाढत गेली. सुरवातीच्या धाकधूकनंतर जसजसे डॉ. शोभा बच्छावांचे लीड वाढत जात कमी होत होते तसतशी माहेरवासियांची घालमेल वाढत होती. (Nashik Lok Sabha Election)

फेरमतमोजणीनंतर शेवटी डॉ. बच्छाव यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली अन् पिंपळगावकवासियांनी अक्षरक्षः दिवाळी साजरी केली. आपली लेक आता दिल्लीला चालल्याचा अभिमान प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवत होता. डॉ. शोभा बच्छाव यांचे पिंपळगाव (वा.) हे माहेर. डॉ. शोभा यांचे प्राथमिक शिक्षण धुळ्यात झाले, त्यांचे वडील कृषी खात्यात अधिकारी असल्याने प्राथमिक शिक्षण फागणे (धुळे) येथील जिल्हा परिषद शाळेत झाले.

माध्यमिक शिक्षण मालेगाव येथील आर. बी. एच. कन्या विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण एमएसजी कॉलेज मालेगाव येथे झाले. पुढे त्यांनी वैद्यकीय शिक्षण डी. एस. एच. मेडिकल कॉलेजमधून झाले. त्यानंतर १९८३ मध्ये त्यांचा विवाह सोनज (ता.मालेगाव) येथील डॉ. दिनेश बच्छाव यांच्याशी झाला. पती डॉ. दिनेश बच्छाव यांच्यासमवेत डॉ. शोभा बच्छाव यांनी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात काम केले.

१९९२ मध्ये डॉ. शोभा बच्छाव नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आल्या. १९९२ ते १९९३ या काळात त्या आरोग्य समितीच्या सभापती होत्या. १९९९ मध्ये त्या नाशिकच्या पहिल्या महिला महापौर झाल्या. २००२ पर्यंत त्या महापौर राहिल्या. २००४ मध्ये त्यांनी नाशिक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली. त्यातही त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. (latest marathi news)

२००८ ते २००९ या कालावधीत त्यांनी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून काम केले. सोबतच धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली. ही राजकीय कारकीर्द चांगली गाजली. नगरसेविका, महापौर, आमदार आणि नंतर मंत्री असा राजकीय प्रवास करत आता पुन्हा त्यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून त्या खासदार म्हणून विजयी झाल्या.

त्यांची धुळे लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर माहेरच्या माणसांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या धुळे लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी पिंपळगावकरांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला. जो तो धुळे मतदारसंघातील नातेवाईकांना डॉ. शोभा बच्छाव यांच्यासाठी मताचा जोगवा मागताना दिसून आला. प्रचार, मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येक जण त्यांच्या विजयाचे गणिते जुळवताना दिसून आला.

मंगळवारी (ता.८) गावातील चावडीवर बसून पिंपळगावकर डॉ. बच्छाव यांच्या मतांचे अपडेट जाणून घेत होता. डॉ. बच्छाव पिछाडीवर असताना थोडा निरुत्साह दिसला. मात्र सायंकाळी शेवटी विजयाची बातमी पिंपळगावात धडकताच पिंपळगावकरांनी विजयोत्सव साजरा केला. २००८ मध्ये डॉ. बच्छाव आरोग्य मंत्री झाल्यावर जो उत्साह पिंपळगावकरांमध्ये होता, त्याच उत्साहाची पुनरावृत्ती त्या खासदार झाल्यावर पाहायला मिळाली. एकूणच पिंपळगावकरांमध्ये सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT