नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवत किमान निर्यातमूल्यही २० टक्क्यांनी कमी केल्यामुळे निर्यातीचा मार्ग खुला होऊन कांद्याचे दर वाढणे अपेक्षित होते; मात्र कांद्याचे दर ‘जैसे थे’ आहेत. दुसरीकडे ग्राहकांना कांदा आजही ६० ते ७० रुपये दराने खरेदी करावा लागत आहे, त्यामुळे निर्यातबंदी हटविल्याचा परिणाम उत्पादक अन् उपभोक्ता दोघांसाठी शून्य ठरला आहे. (after removal of export ban onion prices same)
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी साडेतीन ते चार हजार रुपये भाव मिळत आहे. लासलगाव बाजार समितीत दररोज पाच ते सहा हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होते. त्यापाठोपाठ निफाड, विंचूर, सिन्नर, कळवण, चांदवड, मनमाड, बागलाण, पिंपळगाव बसवंत बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होते.
सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच कांद्याला साडेतीन हजार रुपयांवर भाव मिळण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात १० ते १५ टक्के कांदा शिल्लक असल्याने कितीही भाववाढ झाली तरी आवक आहे तेवढीच राहील. केंद्र सरकारने याचा अचूकपणे अंदाज घेऊन कांदा निर्यातीवरील ५०० डॉलरचे शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला.
यामुळे निर्यात खुली होण्यास मदत झाली व त्याचा कांद्याच्या भावावर थेट परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, कांद्याचे उत्पादनच घटल्याने आता शेतकऱ्यांकडे थोडाच कांदा शिल्लक राहिला आहे. परिणामी, कितीही दर वाढले तरी उन्हाळ कांद्याची आवक वाढणार नाही. त्याला पर्याय म्हणून लाल कांद्याची आवक वाढत चालली आहे. या कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्यामुळे काढणीनंतर हा कांदा तत्काळ बाजारात विक्रीसाठी आणावा लागतो.
नगरचा लाल कांदा वाढला
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक आहे. पण शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. येथे दोन हजार ७७८ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आणि सरासरी तीन हजार १०० रुपये प्रतिक्विंटल त्याला भाव मिळाला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, धाराशिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची आवक उन्हाळपेक्षा अधिक आहे. (latest marathi news)
जून २०२४ मधील कांदा निर्यात
देश...........चलन (रुपये)........ निर्यात (टन)
मलेशिया....१७२.८९............३६,९४३
यूएई..........१५७.२८............३४,५८५
श्रीलंका.......१४५.०१...........३१,७९७
बांगलादेश.....८५.०७.............१९,३२०
कुवेत...........२८.१३..............६,१३५
एकूण...........७४४................१,६२,७५६
लासलगाव बाजार समितीत कांद्याची स्थिती
तारीख.......आवक..........किमान.....कमाल........सरासरी
२८ सप्टेंबर....५,१४०.......३,०००......४,६००.......४,२५१
२७ सप्टेंबर....६,०८८.......३,०००.......४,६३५.......४,४००
२६ सप्टेंबर.....६,९५४.......३,५००.......४,८६७.......४,६००
२४ सप्टेंबर.....६,१२२.......४,०००.......४,९६२.......४,७७०
२३ सप्टेंबर.....४,४९०........३,७२०......४,९०२.......४,७२०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.