Waje, Godse, Hiraman Khoskar, Kashinath Mengal, Nirmala Gavit  esakal
नाशिक

Igatpuri Lok Sabha Constituency : इगतपुरीतील आघाडीच गुंफणार यशाची माळ! मतदानाने ‘महायुती-महाविकास’ची धडधड

फोटो वाजे, गोडसे, हिरामण खोसकर, काशीनाथ मेंगाळ, निर्मला गावित Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारासंघातील लढतीत महायुतीने उमेदवार देण्यास केलेला उशीर महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांच्या पथ्यावर पडणार, असा अंदाज बांधला जात होता.

विजय पगारे, पोपट गवांदे

Igatpuri Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारासंघातील लढतीत महायुतीने उमेदवार देण्यास केलेला उशीर महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांच्या पथ्यावर पडणार, असा अंदाज बांधला जात होता. त्यांनीही प्रचारात घेतलेली आघाडी पाहता इगतपुरीमध्ये ही लढत एकतर्फी होईल, असे सुरवातीचे वातावरण होते. पण महायुतीने नंतर प्रचारात मुसंडी मारली. एकूण ७० टक्क्यापर्यंत मतदान झाले अन् महायुतीसह महाविकास आघाडीचीही धडधड वाढू लागली. ( aghadi in constituency will decide fate of Nashik Lok Sabha victory )

एकूणच या मतदारसंघातील आघाडीच नाशिक लोकसभेच्या विजयाचे भवितव्य ठरविणार आहे, असे आता बोलले जाऊ लागले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहापैकी इगतपुरी मतदारसंघात झालेल्या सर्वाधिक मतदानाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. जास्तीचे मतदान हे उत्स्फूर्त, रोष की विधासभेची रंगीत तालीम असा तर्क काढला जात आहे. हे मतदान कुणाला फायदेशीर ठरणार, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

मात्र प्रत्येकाचीच धडधड या मतदानाने वाढली आहे, हे मात्र नक्की! नाशिक लोकसभेसाठी इगतपुरीमध्ये सरासरी ७२.२४ टक्के मतदान झाले. इतर निवडणुकांपेक्षा हा टक्का वाढलेला आहे, ही चांगली बाब आहे. मात्र तिनेच अनेकांची झोप उडविली आहे. पदाधिकाऱ्यांनी जास्तीचे मतदान आपल्याला की सरकारविषयीचा रोष आहे, याने तर जास्तीचे मतदान दगा देणार का, याने विरोधकांना सतावले आहे. महायुतीचे हेमंत गोडसे व महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्यातच खरी लढत झाली.

दोन्हीही उमेदवार तुल्यबळ असल्याने निकालचे गणित जुळवणे अवघड झाले आहे. अजूनही कार्यकर्त्यांनी आपापले अंदाज एकदम ठोस आहेत, हे सांगता येत नाही. मात्र नाशिकचा खासदार कोण, हे इगतपुरीच ठरविणार हे मात्र निश्चित मानले जात आहे. प्रत्येक उमेदवाराने झालेल्या मतदानाचा आपल्याला कसा फायदा होईल, यादृष्टीने विजयाची मांडणी केली आहे. मात्र उघडपणे कुणीही बोलायला तयार नाही. (latest political news)

एकूण मतदार : २ लाख ७४ हजार ०५४

पुरुष मतदान : १ लाख ५ हजार ८६६,

स्त्री मतदान : ९२ हजार १०९

एकूण मतदान : १ लाख ९७ हजार ९७५

एकूण मतदान ः ७२.२४

आजी-माजींची प्रतिष्ठा पणास

लोकसभेसाठी २०१९ मध्ये इगतपुरीत ५५ टक्के मतदान झाले होते. यंदा मताचा टक्का वाढल्याने याचा फायदा कोणाला होणार, याची चर्चा जोरात सुरू आहे. आमदार हिरामण खोसकर व माजी आमदार काशीनाथ मेंगाळ तसेच माजी आमदार निर्मला गावित यांनी मतदारसंघात पुरेपूर ताकद लावून आपली प्रतिष्ठापणास लावली आहे. त्यामुळे एकप्रकारे ही निवडणूक त्यांच्यासाठी विधानसभेची रंगीत तालीमच ठरली आहे.

माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी हेमंत गोडसेंसाठी, तर महाविकास आघाडीकडून आमदार हिरामण खोसकर व माजी आमदार निर्मला गावित यांनी वाजे यांना ताकद लावली होती. काशीनाथ मेंगाळ यांच्यामागे समाजाचे एकगठ्ठा मतदान असून, याचा फायदा गोडसे यांना होणार का, हा महत्त्चाच मुद्दा आहे.

गेल्यावेळी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती. यंदा मात्र राजकीय परिस्थिती बदलली आहे. वरकरणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना दिसत असला तरी या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट एका बाजूला, तर उर्वरित पक्ष महाविकास आघाडीसोबत असल्याचे चित्र होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Tingare : पुण्यात चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला; वडगावशेरीत घडली घटना

Latest Marathi News Updates : पैसे वाटपाच्या आरोपांवर विनोद तावडेंचं स्पष्टीकरण

...म्हणून 'हम साथ साथ है' मध्ये माधुरी दीक्षितला घेतलं नाही; म्हणते- मी चित्रपटाला नकार दिलाच नव्हता

Vinod Tawde : अन् विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून हॉटेलमधून पडले बाहेर, कारण काय?

IND vs AUS : भारताचे आघाडीचे ६ फलंदाज ठरले? एका फोटोने पर्थ कसोटीसाठीची स्ट्रॅटजी केली उघड

SCROLL FOR NEXT