Nashik News : शहरात डेंग्यू व स्वाइन फ्लूसह तापाच्या आजाराने थैमान घातल्याने महापालिका प्रशासन भूसंपादनासारख्या भ्रष्टाचाराच्या विषयांमध्ये मश्गूल असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचे कार्यालयीन प्रमुख बबलू ठाकूर यांना रुग्ण बनवून महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केले. (Agitation by MNS making fake patient Medical department of NMC)
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शहरातल्या प्रमुख समस्यांवर प्रशासनाला धारेवर धरले जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंगूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर ताप व स्वाइन फ्लूच्या आजाराने नागरिक हैराण आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही.
प्रशासनाकडून संधीचा फायदा घेत वार्षिक डास फवारणीचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. भूसंपादनासारखा विषय प्राधान्याने मंजूर करून घेतला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून यापूर्वीही डेंग्यू व साथीच्या आजारासंदर्भात प्रशासनाला जाब विचारण्यात आला होता. (latest marathi news)
त्यावेळी आश्वासन देण्यात आले, मात्र अद्यापपर्यंत त्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचे रुग्ण संख्या वाढीवरून दिसून येत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. यामुळे थेट वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनातच मनसे पदाधिकाऱ्यांनी ठाण मांडले.
मनसेचे कार्यालयीन प्रमुख बबलू ठाकूर यांनाच रुग्ण बनवून वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांच्यासमोर उभे करण्यात आले. यावेळी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन वैद्यकीय अधिकाऱ्याने दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, किरण क्षीरसागर, अमित गांगुर्डे, निखिल सरपोतदार, रोहन जगताप आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.