Agriculture Assistant Haribhau Khomane informing farmers about the germination potential of soybean seeds. esakal
नाशिक

Agriculture Department : उगवणक्षमता तपासून सोयाबीन पेरणी करा : कृषी विभागाचे आवाहन

सकाळ वृतसेवा

येवला : नुकसान टाळण्यासाठी सोयाबीन बियाण्याची ७० टक्के उगवणक्षमता तपासूनची पेरणी करावी. ६० टक्केपेक्षा कमी क्षमतेची बियाणे पेरणीसाठी वापर करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कृषी विभागाने हडप सावरगांव, लहीत येथे पर्यवेक्षक मधुकर वर्पे, जायदरे येथील कृषि सहाय्यक हरिभाऊ खोमणे यांनी हडप सावरगांव येथील मारुती मंदीर समोर सोयाबीन पिकाची उगवणक्षमता तपासणी कार्यक्रम घेतला. ( Agriculture Department)

त्यात श्री.खोमणे यांनी घरगुती बियाणे उगवण क्षमता तपासणीची प्रात्यक्षिक दाखवले. ओल्या गोणीवर सोयाबीनच्या १०० बिया रांगेत मांडून गुंडाळी करण्यास सांगितले. गुंडाळीला सलग चार ते पाच दिवस पाणी मारण्यानंतर त्यातील १०० सोयाबीन बियापैकी ७० बिया उगवण झाली म्हणजेच बियाण्यांना अंकुर फुटले तर बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के आहे असे सांगितले.

६० टक्के असल्यास बियाणांचे प्रमाण वाढवावे मात्र ६० टक्केपेक्षा कमी उगवण क्षमतेची बियाणे न पेरण्याचा सल्ला दिला. उत्पादकता वाढवण्यासाठी उगवण क्षमता, बीज प्रक्रिया,वाणांची निवड,पेरणी,बियाण्याची मात्रा,पेरणीची खोली,रासायनिक खतांचा वापर तण नाशकाचा वापर या सोयाबीन पिकाच्या अष्टसूत्री पद्धतीचा अवलंब करावा असे खोमणे यांनी सांगितले. (latest marathi news)

सरपंच सविता दत्तू देवरे, उपसरपंच सविता रामनाथ कोल्हे, कृषिमित्र अमोल सोनवणे, दौलत कोल्हे, पंडित झाल्टे, प्रवीण कोल्हे, शशिकांत कोल्हे, अशोक कोल्हे, आण्णा कोल्हे, नामदेव गायकवाड,अशोक कोल्हे, नवनाथ कोल्हे,भगवान कोल्हे,अंबादास कोल्हे, मनोहर कोल्हे,विष्णू कोल्हे,भाऊसाहेब शिंदे, सुनील सोनवणे.

सिताराम कोल्हे,जयराम कोल्हे, कारभारी बनकर,किरण राजपूत,सागर परदेशी,संजय पैठणकर,तुकाराम पैठणकर, अनिकेत पैठणकर,जावेद शेख,रमेश परदेशी, कुंदन परदेशी,नितीन परदेशी,गणेश परदेशी, राजेंद्र कोल्हे,विक्रम कोल्हे,सूर्यकांत परदेशी, अशोक पैठणकर,राजेंद्र पैठणकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT