kharif season esakal
नाशिक

Nashik News : यंदाच्या खरिपात बळीराजाला ‘अच्छे दिन’ची अपेक्षा!

अजित देसाई

सिन्नर : गेल्या वर्षी पावसाने दडी मारल्याने खरिपासह रब्बी हंगाम वाया गेला. जनावरांच्या चाऱ्या- पाण्याची चिंता बळीराजाला सतावत असली तरी येणारा पावसाळा ‘अच्छे दिन’ घेऊन येईल, या अपेक्षेवर खरीप हंगामाच्या तयारीने वेग घेतला आहे. सिन्नर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ६२ हजार १४० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. (agriculture department set target of 62 thousand hectares of sowing area for this year kharif season)

४५ हजार ४९० हेक्टर क्षेत्र सोयाबीन व सहा हजार ५१० हेक्टर क्षेत्र मका लागवडीखाली येईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. गेल्या हंगामात पाऊस पडेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. वेळेवर सुरू झालेल्या पावसाने नंतर मात्र दडी मारली आणि खरिपाच्या संपूर्ण मशागतीचा खर्च वाया गेला.

फेब्रुवारीपासून संपूर्ण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट आहे. जनावरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र या परिस्थितीवर मात करत शेतकऱ्यांनी रब्बीचा पुढचा हंगाम आशादायक असेल, अशी अपेक्षा ठेवली आहे. सिन्नर तालुक्यात ६० हजार ५९० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र खरीप पेरण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र ६२ हजार १४० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होतील, असा अंदाज आहे.

बाजरी पिकासाठी २० हजार ६५७ हेक्टर क्षेत्र निर्धारित केले असले तरी प्रत्यक्षात बाजरी पिकविण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत नाही. यंदाच्या हंगामात चार हजार ३६ हेक्टर एवढ्या क्षेत्रावर बाजरीची पेरणी होईल, असे कृषी विभागाच्या उद्दिष्ट पत्रकात नमूद करण्यात आले आहे. ११ हजार २६६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र मका पिकासाठी प्रस्तावित असले तरी यंदा त्यापैकी सहा हजार ५१० हेक्टर क्षेत्रात मका लागवड होऊ शकते. (latest marathi news)

सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ

२०२१ च्या खरीप हंगामात सोयाबीनची ३० हजार ७१६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. २२ मध्ये ३७ हजार ६५२ हेक्टर, तर २३ मध्ये ३० हजार ३७८ हेक्टर क्षेत्र सोयाबीन लागवडीखाली आले होते. यंदाच्या हंगामात ४५ हजार ४९० हेक्टर इतके क्षेत्र सोयाबीन लागवडीखाली आणण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे.

मका लागवड घटली

चारापीक व उत्पादन, असा दुहेरी फायदा मका लागवडीतून शेतकऱ्यांना होतो. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे कल दिसून येतो. मात्र २०२१ च्या खरीप हंगामात १४ हजार ८७७ हेक्टर, २२ मध्ये १५ हजार ८१५ हेक्टर पेरणी झालेल्या मका पिकात गेल्या वर्षी नऊ हजार ५०७ हेक्टर इतकी घट झाली.

यंदा केवळ सहा हजार ५१० हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज आहे. एक हजार २७० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निश्चित केले असताना कापूस लागवड प्रमाण प्रत्येक वर्षी घटले आहे. यंदा केवळ ३० एकर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

कोरडवाहू बाजरी पीक हे सिन्नरची ओळख राहिले आहे. या ठिकाणी पिकवल्या गेलेल्या बाजरीला सर्वत्र मागणी असायची. मात्र उत्पादकता कमी झाल्याने व शेतकऱ्यांनी मका, सोयाबीनसारख्या नगदी पिकांकडे लक्ष दिल्यामुळे २० हजार ६५७ हेक्टर इतके सर्वसाधारण लागवड क्षेत्र असलेल्या बाजरी पिकामध्ये कमालीची घट झाली आहे.

भात- १७६० हेक्टर, बाजरी- ४०३६, मका-६५१०, तूर- ५०, मूग-७०, उडीद-४०, भुईमूग-४१६०, सोयाबीन- ५४४९०, कापूस ३० हेक्टर याप्रमाणे सिन्नरमध्ये खरीप हंगामातील पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

"यंदा समाधानकारक पावसाळा असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानुसारच सिन्नरमधील खरीप पेरणी उद्दिष्ट निश्चित केले आहे. शेतकऱ्यांनी घाई न करता जमिनीत पुरेशी ओल झाल्यावरच पेरणी करावी. सोयाबीनच्या बाबतीत शक्यतो घरातील बियाणे वापरावे. त्या अगोदर त्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी." - ज्ञानेश्वर नाठे, तालुका कृषी अधिकारी, सिन्नर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT