Millet crop in Harishchandra Patil's farm here. esakal
नाशिक

Nashik Agriculture News: भुईमूग, बाजरी, ज्वारी पिके उपजीविकेपुरताच; शेतकऱ्यांचा नगदी पिके, फळबागा, भाजीपालाकडे कल

Agriculture News : आज-काल तत्काळ पैसा मिळावा म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करतो. यातून शेतकरी तरी कसे दूर राहतील.

संदीप पाटील

Nashik Agriculture News : आज-काल तत्काळ पैसा मिळावा म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करतो. यातून शेतकरी तरी कसे दूर राहतील. याचाच परिणाम म्हणून पारंपरिक बाजरी, भुईमूग, ज्वारी पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घसरले आहे. तर नगदी पिके फळबागा भाजीपाला आदी चलनी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. तालुक्यात ९५ हजार २७८ हेक्टर लागवडी योग्य क्षेत्र आहे. यात बाजरी २१ हजार ५५१ हेक्टर, ज्वारी २७५ हेक्टर, भुईमूग ५४० हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. (Groundnut millet sorghum crops only for livelihood )

ही पिके दैनंदिन उपजीविका भागेल एवढेच आहेत. तर काही शेतकऱ्यांनी या पिकांकडे पाठ फिरवली आहे. नगदी पिके विकून दैनंदिन गरजेपुरते विकत घेतात. इतर क्षेत्रात कपाशी, मका, फळबागा, भाजीपाला, नाममात्र कडधान्ये व गळीतधान्ये आहे. पावसाळी कांद्याची अजून लागवड बाकी असली तरी मोठ्या प्रमाणात क्षेत्र शेतकऱ्यांनी राखीव ठेवले आहेत. पूर्वी जिरायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. म्हणून सर्रास पावसाळी पिके घेतली जात. गेल्या २० ते २५ वर्षांपासून बागायती क्षेत्र दरवर्षी वाढत आहे.

विहिरी, कूपनलिका, शेततळे घेतले जात आहेत. अनेक शेक-यांनी दूरवरून पाइपलाइन केली आहे. गावोगावी साठवण बंधारे, पाझर तलाव वाढले आहेत. शासनानेही ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ धोरण अवलंबिले आहे. म्हणून भूजल पातळीत वाढ होते. ठिबक व तुषार सिंचन यातून पाण्याचा अपव्यय वाचतो. यामुळे बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बागायती क्षेत्र वाढल्यामुळे नगदी पिके, फळबागा भाजीपाला क्षेत्र वाढत आहे. (latest marathi news)

''पारंपरिक पिकांना भाव कमी मिळतो. नगदी पिकांना जास्त मागणी असल्याने जास्त भाव मिळतो. दैनंदिन व्यवहारात आलेले रुपयांचे महत्त्वाने नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल आहे.''- महेंद्र पगार, माजी उपसरपंच विराणे.

''फळबागांचा एकदा तर भाजीपाला पिकांचा नियमितपणे पैसा मिळतो. आज जवळपास ७० टक्क्यांपेक्षा अधिक शेतजमीन पाण्याखाली आल्याने फळबागा व भाजीपाला नगदी पिके शक्य झाले.''- दिनकर चव्हाण, शेतकरी, लुल्ले.

''शेतकऱ्यांनी काळानुरुप आधुनिकतेची कास धरलीच पाहिजे. नवनवीन पिकांचा नियमितपणे प्रयोग केलाच पाहिजे. तरच स्पर्धेत शेतकरी टिकतील.''- गोविंद खैरनार, माजी कृऊबा संचालक, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT