Due to intermittent rains, the maize crop has grown vigorously in the field of farmer Pramod Patil. esakal
नाशिक

Nashik Agriculture News: पिवळं सोनंच बनलं जिल्ह्याचे प्रमुख पीक! येवला,नांदगाव,मालेगाव,सटाण्यात सर्वाधिक पेरणी

संतोष विंचू

येवला : बहु उपयुक्त आणि मागणी असलेल्या पिवळ्या सोन्याला अर्थात मका पिकाला जिल्ह्यात शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. मागील चार ते पाच वर्षापासून कांदा अन् द्राक्षांचा जिल्हा आता मकाचा जिल्हा बनला आहे. यंदाही जिल्ह्यात तब्बल ४६ टक्के क्षेत्रात एकट्या मकाचे पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. (Nashik Agriculture maize become main crop of district)

कमी भांडवल, मर्यादित श्रम, अधिक उत्पन्न देणारे पीक आणि पीक काढणीनंतर पुन्हा रब्बीत दुसरे पीक घेण्याची शाश्‍वती यामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यात मका शेतकऱ्यांचे लाडके पीक बनत आहे. जिल्ह्यातील पीक पॅटर्न गेल्या पाच वर्षापासून बदलत असून, बाजरी, डाळी व तेलबियांचे क्षेत्र निम्य्याने घटून त्याची जागा मकासह कांदा व भाजीपाला पिकाने घेतली आहे.

खरिपातील पाच लाख १६ हजार हेक्‍टरपैकी तब्बल २ लाख ३८ हेक्टरवर मकाच्या पिकाखाली गुंतवले आहे. कमी खर्चात मका हा उत्तम पर्याय ठरत आहे. पोल्ट्री व स्टार्च उद्योगामुळे मकाची मागणी वाढ असून सांगली, सातारा, शिरपूर, दोंडाईचासह गुजरात, तामिळनाडू, हरियाणा, पंजाब आदी राज्यात व युक्रेन, मलेशिया, व्हिएतनाम येथेही मोठ्या प्रमाणात मका निर्यात होतो.

वाढलेल्या मागणीमुळे मागील वर्षी तर खासगी बाजारात दोन हजार ३०० रुपयांच्या आसपास दर पोहोचले होते. केंद्र शासनाने देखील १३२ रुपये दर वाढ करत यावर्षी २ हजार २२५ रुपये हमीभाव निश्‍चित केल्याने मका पीक परवडणारे पीक म्हणून शेतकऱ्यांकडून पसंती मिळत आहे.

पोल्ट्री, स्टार्च उद्योगामुळे अच्छे दिन!

पाऊस कमी असो की जास्त मात्र मकाचे पिक निघतेच. हे पिक घेऊन रब्बीतील गव्हासह उन्हाळ कांद्याचेही पिक घेता येते. बियाण्याच्या किमती मर्यादित फक्त दोन-तीन फवारण्या, मर्यादित खते,आंतरमशागतीसह काढणीचा यंत्रामुळे येणारा अल्प खर्च, जनावरांना चारा तसेच बिट्या झाकून ठेवत केव्हाही मका तयार करून विक्री करता येते. शिवाय भावही परवडणारा मिळत असल्याने सर्वाधिक मकाला पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे मकाचे भाव १००-१५० रुपये कमी जास्त होतात. पण, भाव पडले असे कधीच होत नाही. त्यामुळे हे पिक भरोशाचे झाले आहे. (latest marathi news)

येवला, मालेगाव टॉपला!

दुष्काळी अन अवर्षणप्रवण तालुक्यांनी मकाला हक्काचे पिक बनवले आहे. सर्वाधिक लागवड येवला तालुक्यात झाली असून त्याखालोखाल मालेगावमध्ये मका घेतली आहे. बागलाण व नांदगावमध्ये मका खाली क्षेत्र गुंतले आहे. दहा तालुके मकाकडे वळले असून, वर्षागणिक क्षेत्र वाढत आहे.

"पोल्ट्रीचे प्रमाण वाढले असून, यासाठी मकाला मोठी मागणी आहे. सोबतच स्टार्च उद्योगालाही मका उपयोगात येत असल्याने जिल्ह्यात मकाचे क्षेत्र वाढले आहे. परवडणारा भाव व कमी उत्पादन खर्च, साठवणूक करून केव्हाही पिक विक्रीची पर्याय अन् भावातील सातत्य यामुळे शेतकरी मकाला प्रथम स्थान देत आहेत. जिल्ह्यातील मका युक्रेन, मलेशियासह तामिळनाडूपर्यंत जातो. शेतकऱ्यांसाठी चार पैसे देणारे नगदी पीक म्हणून मकाला पसंती मिळताना दिसते."- हितेंद्र पगार, शेती अभ्यासक, मंडळ कृषी अधिकारी

अशी होते मकाची पेरणी

खरीप हंगाम : १५ जून ते १५ जुलै

रबी हंगाम : १५ ऑक्टोंबर ते १५ नोव्हेंबर

उन्हाळी : १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी

जिल्ह्यातील मकाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका - पेरणी - टक्के

येवला - ४५१५३ - १२८

मालेगाव - ४२२१० - १०८

सटाणा - ३६६६० - १०५

कळवण - १६९५८ - ९७

देवळा - २०३५४ - १२७

नांदगाव - ३६५४४ - १२३

नाशिक - ४१५ - ३०

दिंडोरी - २२२ - ७९

निफाड - १०१०४ - ८०

सिन्नर - १५८२३ - १४०

चांदवड - १४००७ - ७१

एकूण - २३८४५० - ११०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT