Sowing esakal
नाशिक

Nashik Agriculture News : मालेगाव तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस! दमदार पावसाची मात्र प्रतीक्षा

Nashik Agriculture : तालुक्यातील बहुतांशी भागात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. परिणामी पेरण्यांच्या कामाला वेग आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Agriculture News : तालुक्यातील बहुतांशी भागात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. परिणामी पेरण्यांच्या कामाला वेग आला आहे. तालुक्याच्या माळमाथा भागात कपाशी लागवडीची धूम आहे. तर उर्वरीत भागात मका व बाजरी ही पारंपारिक पीके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. तालुक्यात आतापर्यंत ४५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. हवामान विभागाने आगामी आठवड्यात दमदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. (Agriculture rain in Malegaon taluka But wait for heavy rain )

त्यामुळे जूनअखेर ७० टक्क्यापेक्षा अधिक पेरण्या होण्याची शक्यता आहे. यावर्षी मृग नक्षत्रात समाधानकारक पावसाने हजेरी लावली. कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस झाला. तालुक्यात वडेल येथे पंधरा दिवसापुर्वी तर लखाणे येथे काल ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. कृषी विभागाने शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरण्या करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले होते.

तालुक्यातील दहापैकी सहा मंडळांमध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. निमगाव, दाभाडी, करंजगव्हाण या मंडळांमध्येही ९० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. केवळ कुकाणे मंडळात कमी पाऊस झाला आहे. पेरणीयोग्य पावसामुळे बळीराजा काळ्या आईच्या कुशीत रमला आहे. मका, बाजरी, कपाशी आदींची पेरणी केली जात आहे.

खरीप हंगाम जोमात सुरु आहे. या पाश्‍र्वभूमीवर शेतमजुरांनाही काम मिळू लागले आहे. काही शेतकरी अजूनही पुरेशा पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. हवामान विभागाने येत्या काही दिवसात दमदार पावसाचे भाकित वर्तविले आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. तसेच तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला तर यावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरण्यांची कामे पुर्ण होवू शकतील. (latest marathi news)

मंडलनिहाय झालेला पाऊस

मालेगाव : १०२.५

दाभाडी : ८५.१

वडनेर : १००.७

करंजगव्हाण : ९४.४

झोडगे : ११८.२

कळवाडी : १११.७

कुकाणे : ३२.५

सौंदाणे : १६७.६

सायने : ११९.९

निमगाव : ९६.७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT