Nashik Air Service  esakal
नाशिक

Nashik Air Service : इंदूरसाठी विमानसेवेला उद्यापासून सुरवात; आठवड्यातून 3 दिवस विमान सेवा राहणार उपलब्ध

Air Service : विमान सेवेचा विस्तार होत असताना आता नाशिक ते इंदूर या मार्गावर देखील विमान सेवेला रविवार (ता. ३१) पासून सुरवात होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Air Service : विमान सेवेचा विस्तार होत असताना आता नाशिक ते इंदूर या मार्गावर देखील विमान सेवेला रविवार (ता. ३१) पासून सुरवात होत आहे. ओझर विमानतळ येथून आठवड्यातील तीन दिवस ही हवाई सेवा उपलब्ध राहणार आहे. ओझर विमानतळ येथून सद्यःस्थितीत वेगवेगळ्या मार्गांवर विमानसेवा कार्यरत आहे. (Nashik Air service to Indore will start marathi news)

या मार्गांमध्ये आणखीन एका ठिकाणाची भर पडली आहे. रविवार (ता.३१) पासून तर २५ ऑक्टोबरपर्यंत नाशिक ते इंदूर या मार्गावर विमानसेवा उपलब्ध राहणार आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस ही सेवा उपलब्ध असेल. नाशिकहून सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी आणि १२ वाजून २० मिनिटांनी विमान उड्डाण करणार आहे.  (latest marathi news)

अहमदाबाद, नागपूर, गोवा, हैदराबाद या पाठोपाठ आता इंदूर साठी देखील विमानसेवा सुरू होत आहे. सद्यःस्थितीत इंदूरसाठी थेट रेल्वे मार्ग नसल्याने प्रवाशांना वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावरून होत इंदूरला पोहोचावे लागते. रस्ते मार्गाने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून खासगी बस सेवेच्या माध्यमातून प्रवास करावा लागत आहे. अशात विमान सेवा सुरू झाल्याने प्रवाशांची सुविधा होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT