Akshay Suresh esakal
नाशिक

Nashik News : शेतकऱ्याचा नादच खुळा! ट्रॅक्टर घेऊन लडाखला; तिसगावचा युवा शेतकरी अक्षय इखे 2 मित्रांसह ट्रॅक्टर सफारीला

सकाळ वृत्तसेवा

वणी : कुठे फिरायला जायचे नियोजन करायचे असेल तर रेल्वे, विमान, बस किंवा चारचाकी वाहनाचे नियोजन केले जाते. काही पर्यटक सायकल किंवा पायीही जायचे स्वप्न पाहतात. तिसगाव (ता. दिंडोरी) येथील अक्षय सुरेश इखे हा तरुण शेतकरी चक्क ट्रॅक्टरवरून नाशिकला आपल्या दोन मित्रांबरोबर लडाखला निघाला आहे. पाच दिवसांत बाराशे किलोमीटरचे अंतर पार केले. (Akshay Suresh young farmer travel by tractor from Nashik to Ladakh)

तिसगाव येथे शेतात काम करणारा युवक चक्क ट्रॅक्टर घेऊन जगातील अद्‌भूत स्थळांपैकी एक असलेल्या लेह-लडाखला पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मार्गस्थ झाला आहे. तिसगाव ते लडाख असे दोन हजार १५० किलोमीटरचे अंतर ट्रॅक्टरला ट्रॉली लावून आवश्यक साहित्यासह लडाखच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

बर्फाळ पर्वतीय राशी, पर्वतातून खळखळणाऱ्या नद्या अशा निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद व तोही आगळ्यावेगळ्या ट्रॅक्टर सफारीने करण्याचे स्वप्न अक्षय इखेचे होते व तो प्रत्यक्षात साकारत आहे. अक्षय इखेचा छंद म्हणजे तो अनेक दिवसांपासून इन्टाग्रामवर रिल्स बनवत आहे. उदरनिर्वाहासाठी तो द्राक्ष, टोमॅटो, कांदा आदी पिकांची शेतीही करतो.

शेती करीत असताना काहीतरी नवीन करायचे स्वप्न तो पाहत होता. त्याचवेळी त्याने ठरविले, की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात ट्रॅक्टरने कुठे तरी दूर फिरायला जायचे आणि त्याचवेळी त्याने दृढनिश्चय केला, की आपला शेतातील जवळचा मित्र म्हणजे ट्रॅक्टर घेऊनच. अक्षय लडाखला शनिवारी (ता. २२) निघाला. (latest marathi news)

स्वप्नपूर्तीचा मागोवा

अक्षय इखे यास लहानपणापालून ट्रॅक्टरविषयी अधिक आकर्षण असून, ट्रॅक्टरविषयक अनेक फेसबुक लाइव्ह, इन्स्टाग्रामला त्याने व्हिडिओ अपलोड केले आहेत. लडाखला जाताना ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून पावसापासून संरक्षणासाठी प्लॅस्टिक ताडपत्रीचा वापर करून ट्रॉली बंदिस्त करीत आवश्यक कपडे, अंथरुण, पांघरून, गॅस शेगडी, शिधापाणी असे आवश्यक साहित्य सोबत घेतले. महाराष्ट्रातून लडाखला ट्रॅक्टरने येऊन जाऊन सुमारे साडेपाच हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचा पहिला शेतकरी होण्याचे अक्षय इखेचे स्वप्न आहे.

"शनिवारी मी ट्रॅक्टर व दोन मित्रांसह लडाखला निघालो. रोज अडीचशे ते तीनशे किमी अंतराचा प्रवास करीत आहे. रस्त्यात आमच्याशी ठिकठिकाणी शेतकरी व नागरिक संवाद साधत असून, त्यांच्याकडून सुकर प्रवासासाठी मार्गदर्शन व शुभेच्छाही मिळत आहे. आज (बुधवारी) चंडीगड हायवे वर कोतपुतली येथे मुक्कामी आहोत. पुढील सहा सात दिवसांत लडाखला पोहोचण्याचे नियोजन आहे." - अक्षय इखे, युवा शेतकरी, तिसगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT