School Student (file photo) esakal
नाशिक

Nashik Educational News : जिल्ह्यातील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके; समग्र शिक्षा अभियान

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून २०२४ पासून राज्यातील शाळा नियमितपणे सुरू होत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यात आले असून, ही पाठ्यपुस्तके शाळेत वेळेत पोचविण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तक वितरणाला सुरवात करण्यात आली आहे. (students should get textbooks on first day of school)

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत. सोमवारी (ता. १३) लेखानगर येथील पाठ्यपुस्तक भांडार येथून मोफत पाठ्यपुस्तक प्रतींचे वितरण शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. नितीन बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. समग्र शिक्षा जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांतील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अंशतः अनुदानित.

पूर्णतः अनुदानित शाळा आदिवासी विकास विभाग संचालित व अनुदानित आश्रमशाळा, समाजकल्याण विभाग संचालित व अनुदानित शाळा अशा एकूण चार हजार २३८ शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या चार हजार ६६ हजार ३६९ विद्यार्थ्यांकरिता १९ लाख ३३ हजार ७७४ इतक्या मोफत पाठ्यपुस्तक प्रतींचे वितरण करण्यात आले.

१३ ते ३१ मेपर्यंत पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर पोचतील. तालुकास्तरावरून १ ते १२ जूनदरम्यान ती शाळास्तरावर जातील. १५ जूनला शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील. जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या तीन लाख नऊ हजार ७६१ विद्यार्थ्यांसाठी १२ लाख ३९ हजार ४४ इतक्या पाठ्यपुस्तक प्रती. (latest marathi news)

सेमी इंग्रजीच्या एक लाख ४७ हजार ३०७ विद्यार्थ्यांसाठी पाच लाख ८९ हजार २२८ इतक्या पाठ्यपुस्तकांच्या प्रती, उर्दू माध्यमाच्या आठ हजार ११२ विद्यार्थ्यांसाठी ३२ हजार ४४८ प्रती, हिंदी माध्यमाच्या १६४ विद्यार्थ्यांसाठी ६५६ प्रती, इंग्रजी माध्यमाच्या एक हजार २५ विद्यार्थ्यांसाठी चार हजार १०० इतक्या पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण जिल्हा परिषद समग्र शिक्षा यांच्याकडून करण्यात येणार आहे.

सोमवारी या वितरणास सुरवात झाली. त्या वेळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुनील दराडे, भांडार व्यवस्थापक संध्या जाधव, पंचायत समिती त्र्यंबकेश्वर विषयसाधन व्यक्ती प्रमोद पगारे, पाठ्यपुस्तक वितरण केंद्र येथील विजय दाभाडे, शशिकांत धुमाळ यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व निकषपात्र विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पोचविण्यात येणार असल्याने निकषपात्र शाळेतील विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तके विकत घेऊ नयेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. बच्छाव यांनी केले आहे.

...असे होणार वितरण
- १३ ते ३१ मे २०२४ पर्यंत पाठ्यपुस्तक भांडार अंबड ते तालुकास्तरावर
- १ ते १२ जूनपर्यंत तालुकास्तर ते शाळास्तरावर
- १५ जून प्रत्येक शाळास्तरावर शाळेच्या पहिल्या दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT