Nashik News : महसूल व वन विभाग शासन निर्णय ३० जुलै २०२४ नुसार जिल्हा परिषद, नाशिक समाज कल्याण विभागाने ‘एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत दिव्यांग व अव्यंग विवाह केलेल्या लाभार्थी यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, प्रभारी समाजकल्याण अधिकारी डॉ. संजय शिंदे उपस्थित होते. (Allotment of UDID to disabled married beneficiaries )
अतिशय कमी कालावधीत समाजकल्याण विभागाने हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल व लाभार्थ्यांनीही अतिशय कमी वेळात दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद देत विशेष कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल डॉ. गुंडे यांनी अभिनंदन करत, दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी कार्डचे वाटप केले. (latest marathi news)
यावेळी दिव्यांग-अव्यंग विवाह योजनेचे लाभार्थी रमेश तिडके-वर्षा घडवजे, जितेंद्र सोनवणे-प्रणाली निकम, रोहिदास भोये-प्रमिला गावित, सोमनाथ पदाडे-सोनी बोरसे, शिवराज भागवत-मोनिका सोनटक्के, दयानंद चव्हाण-सकू देशमुख, रूपेश दोंदे-पूजा पगारे, प्रसाद बोडके-नयना काडगी, तुळशीदास मेघे-मनीषा गावित, रमेश भोये-ममता चौरे यांचा सत्कार झाला. डॉ. शिंदे यांनी प्रास्ताविक तर, अधीक्षक मदन बढे यांनी आभार मानले.
या दिव्यांगांना युडीआयडी कार्ड
रोशन पुराणिक, आधार साळवे, मणियार उस्मान सय्यद, आकाश पगारे, सुशांत सोमंवशी, सोनल देवरे, स्वरा मोरे, ओम शिंदे, आदित्य टोंगारे, आनंद जाधव, मोहमंद नजीम सलीम शेख, भावना भावसार, गौरव पाटील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.