Onion  esakal
नाशिक

Nashik Onion Export : कांदा निर्यातबंदी तोंडाला पुसली पाने; आता प्रतिक्षा भाववाढीची

संतोष विंचू

येवला : लेव्हीच्या वादामुळे गेले ३५ दिवस बंद राहिलेली येथील बाजार समिती मागील आठवड्यापासून सुरळीत सुरू झाली आहे. शेतकरी आपला कांदा विक्रीला आणत आहे. मात्र, कांदानिर्यात खुली केल्याची चर्चा झाली असली तरी बाजारभाव वाढत नसल्याने शेतकऱ्यांना दोन हजारांचा टप्पा वाढीची प्रतीक्षा आहे. येथील बाजार समितीत दररोज पाच ते सात हजार क्विंटल कांदा विक्रीला येतो. (Nashik Although onion export is open but market price is not increasing)

लासलगाव, पिंपळगाव बसवंतनंतर सर्वाधिक उलाढाल होणारी येथील बाजार समिती आहे. विशेष म्हणजे शेजारील वैजापूर, नगर जिल्ह्यातील शेतकरीही कांदा विक्रीला येवल्यात येतात. बाजार समितीने शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या असून, इतर बाजार समित्यांच्या तुलनेत बाजारभावही चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांची पसंती वाढत आहेत.

मार्च अखेरीस २८ मार्चला येथील बाजार समिती बंद झाली होती, ती शनिवारी (ता. ४ मे) ३५ दिवसानंतर सुरू झाली आहे. बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे, उपसभापती बापूसाहेब गायकवाड, सचिव कैलास व्यापारे, व्यापारी संचालक नंदकुमार अट्टल व भारतशेठ समदडिया, व्यापारी असोसिएशनचे नेते रामेश्‍वर कलंत्री.

मापारी संचालक अर्जुन ढमाले, मापारी नेते भानुदास जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी व नेत्यांनी एकमताने पुढाकार घेऊन शेतकरी हितासाठी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला. लिलाव सुरळीत झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. पहिल्या दिवशी कांदा दराने २ हजारांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, तो क्षणिक ठरला. (latest marathi news)

सध्या ५०० ते १८०० रुपये, तर सरासरी १५५० रुपयांचा दर मिळत आहे. तर लिलावाच्या दिवशी चारशे ते पाचशे वाहनांतून पाच ते सात हजार क्विंटलच्या आसपास कांदा विक्रीला येत आहे. याशिवाय मका, गहू व इतर भुसार मालाचे लिलावही सुरळीतपणे सुरू आहेत. गेल्या चार महिन्यांपासून सांभाळलेल्या कांद्याला सध्याचा दर परवडत नसल्याने शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे.

केंद्र शासनाने निर्यात खुली केली असली तरी निर्यात शुल्क वाढवल्याने दर वाढत नसल्याची नाराजी शेतकरी व्यक्त करतात. दरम्यान, लेव्हीचा मुद्दा अद्यापही वादातीत असून तात्पुरत्या स्वरूपात हमाली-तोलाई पावतीत कपात न करता रोख स्वरूपात कपात करून लिलाव सुरळीत सुरू आहेत. यामुळे शेतकऱ्यांची कांदा विक्रीची सोय झाल्याने आवक वाढत आहे. डोंगरगाव येथील खरेदी केंद्रावर देखील कांदा खरेदी सुरू आहे.

गेल्या महिन्यात अंदाजे २ लाख क्विंटल कांद्याची खरेदी-विक्री ठप्प झाली. यामुळे सरासरी दर प्रतिक्विंटल १२०० रुपये धरला तरी २८ ते ३० दिवसांत २५ ते ३० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या काळात खासगी व्यापाऱ्यांना मिळेल त्या दराने कांदा विक्रीची वेळही आल्याने हा देखील फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या उन्हाळ कांद्याच्या अनुषंगाने दर परवडणारा नसल्याने अनेक शेतकरी कांदा विक्री करीत नसल्याचे चित्र आहे.

"हमाली-तोलाई रोख स्वरूपात घेतली जात असून, मागील शनिवारपासून येथील बाजार समितीत सुरळीत लिलाव सुरू झाले आहे. विक्री झालेल्या शेतमालाचे पैसे देखील रोखीने दिले जातात. भाव सरासरी १५०० रुपयांच्या आसपास आहेत. तर आवकही पाच ते सात हजाराच्या दरम्यान टिकून आहे." - किसनराव धनगे, सभापती, येवला बाजार समिती

असे आहेत बाजारभाव

शेतमाल किमान - कमाल - सरारारी

कांदा - २५१ - १७९० - १५००

मका - २०८० - २२९५ - २२६१

सोयाबीन - ४३२५ - ४५०० - ४४४०

गहू - २३०१ - ३१५० - २७५१

बाजरी - २१११ - २९५२ - २७००

चना - ३८९९ - ६९०० - ६१५०

तुर - ७००१ - १०१०० - ९७७५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT