Collector Jalaj Sharma, Upper Collector Babasaheb Pardhe giving information about the Lok Sabha elections. esakal
नाशिक

Nashik District Collector : दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर सॅटेलाईट सुविधा : जिल्हाधिकारी जलज शर्मा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, दुर्गम भागात कर्मचाऱ्यांना सॅटेलाईटची सुविधा कार्यान्वित केली आहे. संपर्कासाठी पोलिसांच्या वॉकीटॉकीची सुविधा असेल आणि किमान दोन किलोमीटरच्या आत मतदान केंद्राची सुविधा असल्याने जास्तीत जास्त मतदान होईल. (Nashik and Dindori Lok Sabha elections district administration provide satellite facility)

असा विश्‍वास जिल्हाधिकारी जलज शर्मा व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवडणूक उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर उपस्थित होते.

प्रत्येक मतदान केंद्रावर गरज पडल्यास रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याबरोबरच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकास सज्ज राहण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती जलज शर्मा यांनी दिली. पावसापासून संरक्षणासाठी वॉटरप्रूफ मंडप टाकण्याचे आदेश दिले आहेत. (latest marathi news)

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघ मिळून ४४ भरारी पथके, ८२ स्थायी पथके, २४ चलचित्र सर्वेक्षण पथके, १२ चलचित्र निरीक्षण पथके, १६ आंतरजिल्हा, आंतरराज्य तपासणी नाक्यासह सज्ज आहेत. भरारी व स्थायी पथकांमध्ये केंद्रीय पोलिस दलाचे सदस्य समाविष्ट केले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा व अप्पर जिल्हाधिकारी पारधे यांनी केले आहे.

- मतदार संख्या (मतदान केंद्रे)

दिंडोरी मतदारसंघ : १८ लाख ५३ हजार ३८७ (१९१०)

नाशिक मतदारसंघ : २० लाख ३० हजार १२४ (१९२२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT