Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : विद्युत कार्यालयातील लाचखोर महिला शिपायाला अटक!

Nashik News : विद्युत निरीक्षक कार्यालयातील शिपाई महिलेस ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

सकाळ वृतसेवा

Nashik News : विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळण्यासाठी द्वारका येथील विद्युत निरीक्षक कार्यालयातील शिपाई महिलेस ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (anti corruption department team arrested woman worker in Electricity Inspector office)

गीता हेमंत बोकडे (वय ४५, रा. गणेश वास्तू अपार्टमेंट, अशोका मार्ग, नाशिक) असे लाचखोर महिला शिपाई महिलेचे नाव आहे. इलेक्ट्रिक इंजिनिअर असलेल्या तक्रारदार महिलेने विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळण्यासाठी द्वारका येथील विद्युत निरीक्षक कार्यालयातील उद्योग ऊर्जा कामगार विभागात अर्ज केला होता.

गीता बोकडे याच कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. परवान्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून परवाना मिळून देईल, असे सांगून तक्रारदार महिलेकडे १५०० रुपयांची बोकडे यांनी मागणी केली. त्यानुसार यापूर्वी एक हजार रुपये बोकडे यांनी घेतले होते. (latest marathi news)

याबाबत तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी करून सोमवारी (ता. १३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळ रचला. गीता बोकडे यांनी उर्वरित ५०० रुपये पंचासमक्ष स्वीकारले. पथकाने लाचखोर महिला बोकडे यांना अटक केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार संदीप वणवे, हवालदार ज्योती शार्दुल यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT