farmer esakal
नाशिक

Nashik News : पावसाच्या हुलकावणीमुळे खरिप धोक्यात! बागलाणमधील शेतकऱ्यांमध्ये चिंता

अंबादास देवरे

Nashik News : बागलाण तालुक्यात दोन वर्षांपूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीने तर गेल्यावर्षी अल्प पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला. कोणतेही लघु व मध्यम प्रकल्प न भरल्यामुळे जमिनीतील वॉटर टेबलची पातळी खालावली. विहिरींनी तळ गाठला व रब्बी हंगामावर त्याचा विपरीत परिणाम झाला. दोन्हीही हंगाम हातातून गेल्याने सर्वच शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली. चालू खरिपासाठी आर्थिक विवंचनेत असतानाही धडपड करीत शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. (Anxiety among farmers in horticulture due to delay of monsoon)

बागलाण तालुक्यात यंदा सुमारे ६८ हजार ८३२ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. निर्यातक्षम द्राक्षांबरोबरच सुधारित जातीच्या डाळिंब पिकाचे उत्पन्न घेणाऱ्या बागलाण तालुक्यात यंदा तेल्या रोगाने थैमान घातल्याने डाळिंब पीक नेस्तनाभूत होण्याच्या मार्गावर आहे. तर अवकाळी, नैसर्गिक आपत्ती बरोबरच घसरते. बाजारभावामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याचे पाहून द्राक्ष उत्पादकांनी, तर तेल्याच्या आक्रमणामुळे डाळिंब उत्पादकानी या दोन्ही कॅश क्रॉप्स पाठ फिरवून पुन्हा पारंपारिक मका, पावसाळी कांदा आणि भाजीपाल्याकडे आपला मोर्चा वळविल्याचे चित्र बागलाण तालुक्यात आहे.

त्यामुळे यंदा या पिकांच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी अपुरा पाऊस झाला तरीही मक्याचे क्षेत्रच जास्त राहिले. यंदाही मका, कांदा, बाजरीपाठोपाठ भाजीपाल्यावर शेतकऱ्यांचा अधिक भर राहणार असून, त्यादृष्टीने नियोजन सुरु आहे. बागलाणचा आदिवासी पश्‍चिम पट्टा भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे भाताच्या लागवड क्षेत्रात मोठी घट झाली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदा चांगला पाऊस पडणार असल्यामुळे यंदा मका, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांना शेतकऱ्यांची पसंती जास्त आहे. रासायनिक खतांची साठेबाजी, बोगस बियाणे, चढ्या दराने होत असलेली खते-बियाणे विक्रीवर आळा घालण्यासाठी कृषी विभाग सध्या ॲलर्ट मोडवर आहे. सालाबादप्रमाणे मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना कीड नियंत्रणाचे मार्गदर्शन दिले जात आहे. (latest marathi news)

लघु प्रकल्पांनी गाठला तळ

तालुक्यातील पश्‍चिमेकडील हरणबारी व केळझर या दोन्ही प्रमुख मध्यम प्रकल्पात चार ते पाच टक्के जल साठा शिल्लक आहे. तर दसाना, पठावा, जाखोड, दोधेश्‍वर, तळवाडे, शेमळी हे लघु प्रकल्प मात्र कोरडेठाक आहेत. हे प्रकल्प भरण्यासाठी जून महिन्यात पडणारा पाऊस महत्वाचा असतो. यंदा मात्र अजूनही चांगल्या पावसाळ्याचे संकेत नाहीत. या प्रकल्पांच्या पाणलोटक्षेत्रात पावसाला अजून सुरुवातही झालेली नाही. पाऊस लांबल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

''बागलाण तालुक्यात सुमारे ६८ हजार ८३२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकपेरा अपेक्षित आहे. पंचायत समितीच्या कृषी विभागाने तसे नियोजनही केले आहे. अद्याप पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली पीक निश्‍चिती करूनच पेरणी करावी.''- भास्कर जाधव, कृषी अधिकारी, बागलाण

पिक पेरा नियोजन ....

* मका- ४१८०० हेक्टर

* बाजरी- १४५०० हेक्टर

* ऊस -१९५० हेक्टर

* सोयाबीन - ३२८९ हेक्टर

* भात - २४५० हेक्टर

* भुईमुग - १००० हेक्टर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT