NMC Nashik  esakal
नाशिक

Nashik NMC Medical Recruitment : महापालिकेच्या वैद्यकीय भरतीसाठी चार हजारांवर अर्ज

Latest NMC Medical Recruitment News : ‘एएनएम’ पदासाठी सर्वाधिक ७७५ , तर स्टाफ नर्ससाठी ७४७ अर्ज प्राप्त झाले. रिक्तपदे सरळसेवेने भरती करण्याची परवानगी नसल्याने वैद्यकीय सेवा सक्षम करण्यासाठी मानधनावर भरण्याचा निर्णय घेतला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik NMC Medical Recruitment : महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील मानधनावरील १६९ पदांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी (ता. ४) शेवटच्या दिवशी चार हजार ७८ अर्ज प्राप्त झाले आहेत. ‘एएनएम’ पदासाठी सर्वाधिक ७७५ , तर स्टाफ नर्ससाठी ७४७ अर्ज प्राप्त झाले. रिक्तपदे सरळसेवेने भरती करण्याची परवानगी नसल्याने वैद्यकीय सेवा सक्षम करण्यासाठी मानधनावर भरण्याचा निर्णय घेतला. (Applications for NMC Medical Recruitment 4 thousand)

१८९ मंजूर पदांपैकी सध्या ६५ डॉक्टर कार्यरत आहेत. १२४ रिक्तपदांसाठी मानधनावर भरती होत आहे. १०६ आरोग्यवर्धिनी केंद्रे व २५ आपला दवाखान्यासाठी डॉक्टरांची पदे भरली जाणार आहेत. ४७ आरोग्यवर्धिनी केंद्रे व १४ आपला दवाखाने सुरू आहेत.

चार ऑक्टोबरला अर्ज दाखल करण्याची शेवटच्या मुदतीत शल्यचिकित्सक पदासाठी- ४, वैद्यकशास्त्र तज्ञ- ७, स्त्रीरोगतज्ज्ञ- १७, बालरोगतज्ज्ञ- ४, क्ष-किरण तज्ज्ञ- ४, नेत्ररोगतज्ज्ञ- ७, नाक कान घसा तज्ज्ञ- ४, मानसोपचारतज्ज्ञ- १, त्वचा रोग तज्ज्ञ- १०, एमडी मायक्रो बॉयलॉजिस्ट- ०, रक्त संक्रमण अधिकारी- ५, अस्थिरोगतज्ज्ञ- ११, भूलतज्ज्ञ- १३, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)- १००, वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) - ३३७, स्टाफ नर्स- ७४७, एएनएम- ७७५, मिश्रक- ६२२, प्रयोगशाळा (रक्तपेढी) तंत्रज्ञ- २००, परिचर प्रयोगशाळा- ६१५, संगणक ऑपरेटर- ५९५ असे एकूण ४०७८ अर्ज प्राप्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT