Steps with historical records. esakal
नाशिक

Nashik News : पुराची ऐतिहासिक नोंद असलेल्या पायऱ्या जीर्ण; पुरातत्त्व विभागाकडून व्हावे जतन

Nashik : नाशिकच्या पूर इतिहासाची नोंद असलेली सरकारवाडा येथील पायऱ्या हा एक ऐतिहासिक पुरावा आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिकच्या पूर इतिहासाची नोंद असलेली सरकारवाडा येथील पायऱ्या हा एक ऐतिहासिक पुरावा आहे. मात्र तो नष्ट होण्याच्या मार्गावर असून, यात लेख असलेली शिला तुटली आहे, तर दुसरा लेख अतिशय जीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे, या वाड्यात राज्य पुरातत्त्व विभागाचे कार्यालय आहे, तरी या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या लिखित पुराव्याचे पुरातत्त्व विभागाने जतन करावे, अशी मागणी इतिहास अभ्यासक करीत आहेत. ( Archeology Department should preserve dilapidated stairs with historical records of flood )

स्वातंत्र्यपूर्व काळापासून बदलाचा साक्षीदार असलेल्या सरकार वाड्याच्या पायऱ्यांवर स्वातंत्र्यपूर्व काळात गोदावरी नदीच्या पुराचे पाणी कुठपर्यंत आले होते, त्याची नोंद वाड्याच्या पायऱ्यांवर केली आहे. यामध्ये १९३९ मध्ये पुराचे पाणी ज्या पायरीपर्यंत आले त्या पायरीवर H. F. L. 25.8.1939 AT TOP अशी पुराच्या तारखेची नोंद व ^ अशी खूण करण्यात आली आहे, तसेच आणखी एका पायरीवर ७९ एच.एफ.एल. अशी नोंद आहे. (latest marathi news)

म्हणजेच १९३९ व १९७९ या वर्षी पुराचे पाणी सरकार वाड्याच्या अकराव्या पायरीपर्यंत आले होते. याची कोरीव नोंद त्या पायरीवर केलेली आहे. नाशिक शहरात प्राचीन भारतातील इ. पू. पहिल्या शतकाच्या सात वाहनांच्या इतिहासाची माहिती सांगणारे अनेक लिखित पुरावे उपलब्ध आहेत. नाशिक आणि दक्षिण भारताची ओळख असलेली गंगा गोदावरी नदी अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे.

''राज्य पुरातत्त्व विभागाने याकडे लक्ष देऊन नाशिकच्या इतिहासाचा ऐतिहासिक ठेवा असलेला हा लेखरुपी पुराव्याचे जतन करायला हवे.''- प्रा. डॉ. रामदास भोंग, इतिहास अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT