Arogyavardhini need for staff for dispensary project esakal
नाशिक

Nashik News : भरतीसाठी निवडणूक शाखेकडून मार्गदर्शन मागविले; ‘आरोग्यवर्धिनी’, आपला दवाखाना प्रकल्पासाठी कर्मचाऱ्यांची गरज

Nashik News : महापालिकेचे अनेक विकासकामे रखडली आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्यवर्धिनी केंद्र व आपला दवाखाना हे प्रकल्प रखडले आहे. या प्रकल्पासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होत असतानाच दुसरीकडे विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेचे अनेक विकासकामे रखडली आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्यवर्धिनी केंद्र व आपला दवाखाना हे प्रकल्प रखडले आहे. या प्रकल्पासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. ( Arogyavardhini need for staff for dispensary project)

त्या भरतीसाठी निवडणूक शाखेकडून मार्गदर्शन मागविले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जूनला झाली. ५ जूनला आचारसंहिता संपुष्टात आली. त्यामुळे महापालिकेच्या कामांना वेग येईल. असे असले तरी शिक्षक मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू असल्याने मतदारांवर प्रभाव पडेल असे निर्णय घेता येणार नाही. महापालिकेकडून आरोग्य केंद्र तसेच आपला दवाखाना तयार करण्यात आले आहेत.

मात्र या केंद्रांमध्ये कर्मचारी वर्ग नाही. आरोग्यवर्धिनी केंद्रावर चार ठिकाणी डॉक्टर व अठरा ठिकाणी आरोग्यसेवक, बारा ठिकाणी आरोग्य सेविका आवश्यक आहे. मात्र कर्मचारी वर्ग नसल्याने आरोग्य सेवेवरदेखील परिणाम होत आहे. १२ मार्चला ४६ आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन झाले. मात्र त्यानंतर वैद्यकीय कर्मचारी नसल्याने केंद्र बंद करावे लागले. (latest marathi news)

नियुक्तीपत्र देऊनही डॉक्टर हजर न झाल्याने प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्यात आले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. लोकसभेची आचारसंहिता ५ जूनला संपुष्टात आली. मात्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली असल्याने आचारसंहितादेखील लागू आहे. त्यामुळे भरतीसाठी निवडणूक शाखेकडून मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.

चौदा जागा निश्‍चित

महापालिकेकडून शहरात २५ आपला दवाखाने उभारण्यात आले आहेत. यासाठी चौदा जागा निश्चित करण्यात आल्या असून, करारनामादेखील झाला आहे. केंद्र सुरू होण्यासाठी जुलै महिन्यात शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता शिथिल होण्याची वाट पहावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT