Chief Minister Eknath Shinde, Guardian Minister Chandrakant Patil, Minister Girish Mahajan etc. honored Balkrishna and Ashabai  esakal
नाशिक

Ashadhi Ekadashi: अंबासनच्या बाळकृष्णाला अखेरीस विठ्ठल पावला; भाजीपाला विक्रेत्या दांपत्यास पंढरपुरात शासकीय पूजेचा मान

- दीपक खैरनार

Ashadhi Ekadashi : ‘विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल...’ अशा नामस्मरणात रममाण झालेल्या अंबासन येथील भाजीपाला विक्रेत्या अहिरे दांपत्यास यंदा आषाढी एकादशीनिमित्त थेट पंढरपुरात शासकीय महापूजेचा मान मिळाल्याने संपूर्ण पंचक्रोशीत त्यांचे कौतुक होत आहे. पंधरा वर्षांपासून न चुकता वारीला जाणाऱ्या ‘बाळकृष्णाला अखेरीस विठ्ठल पावला’ अशी भावना परिसरात व्यक्त करीत अहिरे दांपत्यास मोठी पर्वणीच ठरल्याचे बोलले जात आहे. (Ashadhi Ekadashi Vegetable seller couple honored with government worshipped in Pandharpur )

अंबासन गावातील सर्वसाधारण कुटुंबातील बाळकृष्ण शंकर अहिरे व त्यांच्या पत्नी आशाबाई वडिलोपार्जित एक एकर क्षेत्रात शेतीसह गाव परिसरातील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. या दांपत्यास दोन मुले असून, एक नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत माथाडी कामगार आहे, तर एक इलेक्ट्रिक व्यवसाय करीत आहे. वारकरी संप्रदायातील बाळकृष्ण त्र्यंबकेश्वर व पंढरपूर पायी वारीत आई यशोदाबाई व वडील शंकर देवचंद अहिरे यांच्यासोबत जात.

परोपकारी वृत्ती आणि भगवंताची भक्ती हा या कुटुंबातील गुण. ‘कांदा-मुळा भाजी, अवघी विठाई माझी...’ ‘लसूण, मिरच्या, कोथिंबीर, अवघा झाला माझा हरी...’ या संत सावता माळी यांच्या अभंगातील ओवी या वेळी आठवण देतात. आई- वडिलांच्या पाउलवाटेवर हे दांपत्य नामपूर, अंबासन, वडनेर खाकुर्डी व अजंग-वडेल या आठवडे बाजारात जाऊन आजतागायत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुराकडे ‘भेटी लागे जीवा’ म्हणत ते सोमवारी पंढरपूरच्या प्रवासाला निघाले होते. पांडुरंगाच्या दर्शन रांगेत उभे असतानाच दांपत्यास पांडुरंगाच्या पूजेसाठी विचारणा करण्यात आली. त्या वेळी या अहिरे दांपत्यास सुखद धक्का बसला. नाशिक जिल्ह्यातील काळ्या मातीतील कष्टकरी शेतकरी व भाजीपाला विक्रेत्या दांपत्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शासकीय महापूजेचा मान मिळाल्याने संबंध अंबासनकर या आनंदोत्सव न्हाऊन निघाले. (latest marathi news)

मानकरी यजमानासाठी अविस्मरणीयच

धावपळीच्या काळात कुणालाही वेळ नाही. जो तो शॉर्टकट शोधण्याच्या प्रयत्नात असतो. अगदी देवदर्शनासाठीही अनेक जण व्हीआयपी पास घेतात अन् जलद दर्शन घेऊन मार्गस्थ होतात. मात्र याबाबत पांडुरंगाचा वारकरी अपवाद म्हणावा लागेल. मजल-दरमजल करत पंढरपुरात पोचायंच, त्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनासाठी दोन-दोन दिवस दर्शन रांगेत उभं राहायचं.

एवढी सहनशीलता महाराष्ट्रातील सर्वांत मोठा संप्रदाय असलेल्या वारकऱ्यांमध्ये बघायला मिळते. त्यात एवढा वेळ दर्शनासाठी प्रतीक्षा करून जर शासकीय पूजेचा मान मिळत असेल, तर तो क्षण त्या मानकरी यजमानासाठी अविस्मरणीयच ठरतो. यंदा आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या पूजेचा मान अंबासन येथील अहिरे दांपत्यास मिळाला. त्यांच्या या पूजेच्या यजमान पदाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.

''आज माझा मुलगा व सुनेला खरोखरच पांडुरंग पावला, मनातही नव्हते. मात्र पांडुरंगालाच करू घ्यायचे असेल, दोघांना महापूजेचा मान मिळाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे.''- शंकर अहिरे, अंबासन (बाळकृष्ण अहिरे यांचे वडील)

''आम्ही दर वर्षी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी गाडीवर येतो. दर्शन घेतल्यानंतर निघून जातो. यंदाही देवाचे दर्शन घ्यायचं आणि घरी निघून जायचं, असं आम्ही ठरवलं होतं. पण आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विठुरायाची शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला आणि या गोष्टीचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. पंधरा वर्षांपासून आम्ही पंढरपूरची वारी करीत आहोत. विठुरायाच्या महापूजेचा मान मिळाल्याने आमचे जीवन सार्थक झाले आहे.''-आशाबाई अहिरे, अंबासन (बाळकृष्ण यांची पत्नी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT