Chief Executive Officer Ashima Mittal, Deputy Chief Executive Officer Deepak Patil, Executive Engineer Sandeep Sonwane etc. Officers and employees present in the second photograph. esakal
नाशिक

Nashik ZP: सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचा 116 गावांनी वस्तुनिष्ठ अहवाल द्या; आशिमा मित्तल यांचे यंत्रणेला निर्देश

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP : स्वच्छ भारत अभियान (ग्रा) अंतर्गत जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ११६ गावांमध्ये मोठ्या उपाययोजना प्रस्तावित असून, या सर्व गावांमधील प्रकल्प अहवालांची पडताळणी करून वस्तुनिष्ठ प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मंगळवारी (ता. २५) दिले. ( Ashima Mittal statement of 116 villages to report objective on sewage and solid waste management)

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे मंगळवारी जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात पाच हजारांवरील लोकसंख्येच्या ११६ गावांमधील ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता व उपअभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा), शाखा अभियंता, कंत्राटी अभियंता तसेच प्रकल्प तयार करणाऱ्या टेक्नो ग्रीन प्रा. लिमिटेड (पुणे), आटपाटी ग्रामीण विकास संस्था (सांगली) व ऑल इंडिया सेल्फ सर्व्हिसेस (नाशिक) यांची आढावा बैठक झाली.

बैठकीत श्रीमती मित्तल यांनी आढावा घेताना प्रकल्पाबाबत विविध निर्देश दिले. प्रकल्प अहवाल तसेच अंदाजपत्रक याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कार्यवाही करावी. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन वस्तुनिष्ठ व गावांना आवश्यक असणाऱ्या सुविधांचा अहवालात समावेश करावा. शासनाकडून प्राप्त ५१ मुद्यांनुसार तपासणी करून सदरचे प्रकल्प अहवाल तातडीने तयार करण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी दिले. (latest marathi news)

पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी सदर प्रकल्प अहवाल वेळेत तयार झाल्यावरच त्याची निविदा करणे शक्य होणार असून, गावात कामे करता येणार असल्याने सर्वांनी समन्वयाने काम करण्याबाबत निर्देश दिले. या वेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्यासह जिल्हा कक्षातील सल्लागार उपस्थित होते.

पाच हजारांवरील गावांमध्ये होणार कामे

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील पाच हजारांवरील लोकसंख्येच्या ११६ गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे करण्यात येणार आहेत. यात सांडपाणी व्यवस्थापनात सार्वजनिक शोष खड्डे, सार्वजनिक स्थिरीकरण तळे तसेच एसटीपी, सार्वजनिक नाले यांचा समावेश असून, घनकचरा व्यवस्थापनात सार्वजनिक कंपोस्ट खड्डा, घंटागाडी, कचराकुंडी, सार्वजनिक कचरा विलगीकरण शेड यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पठ्ठ्यानं 31000 करोडला विकली कंपनी अन् कर्मचाऱ्यांना 40 कोटींचा फायदा, कोण आहेत तो भारतीय उद्योगपती?

Navratri 2024: मुलींना वयाच्या ५ व्या वर्षी शिकवाव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी, प्रत्येक आई-वडीलांची जबाबदारी

Amazon Prime Free : ॲमेझॉन प्राईमवर पैसे खर्च न करता एंटरटेनमेंट हवंय? फ्रीमध्ये मिळणार सबस्क्रिप्शन, वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स

अरे भाऊ...! भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीवर कॅप्टन Suryakumar Yadav इम्प्रेस, भन्नाट Video

Rhea Chakraborty : ड्रग्स घोटाळ्यातून सुटते न सुटते तोच रिया अडकली पुन्हा संकटात ! 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

SCROLL FOR NEXT