Nashik News : जिल्ह्यात मुलींचे जन्मदराचे प्रमाण हे हजारीमागे ९३२ आहे. नाशिक जिल्हा हा राज्यात मागील तिमाहीत प्रथम क्रमांकावर आहे. हा क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी आरोग्य विभाग सतत प्रयत्नशील असून, विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. मुलगी वाचवा उपक्रमात समाजाने सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. (Ashima Mittal statement Society should participate in save girl initiative)
तसेच, समाजात लिंग समानता असावी, यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात बुधवारी (ता. २६) आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आढावा बैठक झाली. बैठकीत मुलींच्या जन्मदराबाबत चर्चा झाली. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न सुरू असतानाच सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील व्यक्तींकडूनही निःस्वार्थ भावनेने काम करण्यात येत आहे.
मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या व मुलगी वाचवा उपक्रमात सक्रिय सहभागी असलेल्या जिल्ह्यातील तिघांचा या वेळी जिल्हा परिषदेतर्फे सन्मान करण्यात आला. यात लासलगावातील भेळ विक्रेते वैभव भास्करराव पवार यांनी अभिनव उपक्रम राबविला असून, त्यांनी भत्ता विक्री करताना पिशवीच्या मागील बाजूस मुलगी वाचवा याबाबतचा संदेश छापला आहे.
ग्रामीण रुग्णालय, घोटी येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय देवराम सदावर्ते हे प्रभावीपणे गर्भलिंग निदान व प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी जनजागृती करीत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा सरकारी वकील श्रीधर पांडुरंग माने यांनी वेगवेगळ्या संवेदनशील विषयांमध्ये शासनाच्या बाजूने निकाल लागण्यासाठी प्रभावीपणे बाजू मांडली असून, गर्भलिंग निदान व प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाला मदत केली आहे. (latest marathi news)
या तिघांच्या कामाची दखल घेऊन श्रीमती मित्तल यांच्या निर्देशनानुसार त्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान झाला. कोणत्याही नागरिकाला कुठे गर्भलिंग निदान होत असेल तर https://amchimulgimaha.in या संकेतस्थळावर तसेच १८००२३३४४७५ या निशुल्क क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन मित्तल यांनी या वेळी केले.
या वेळी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा विविध विषयांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राहुल हाडपे, सुवर्ण शेपाळ, दीपक जाधव, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रदीप निकम, तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.