lok sabha Constituency  esakal
नाशिक

Nashik Assembly Constituency : उत्तर महाराष्ट्रातील निवडणूक निकालाबाबत उत्कंठा शिगेला; कोण जिंकणार, कोण हरणार याविषयी पैजा लागल्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik Assembly Constituency : येत्या दोन दिवसांत जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाबाबत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव व रावेर या सहा मतदारसंघातील नेते, कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. आपल्या मतदारसंघात निवडणुकीत कोण जिंकणार व कोण हरणार याविषयी विविध अंदाज वर्तवित कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या आहेत. तसेच शनिवारी (ता.१) एक्झिट पोलने निकालाविषयी वर्तविलेल्या अंदाजानंतर खेड्यापाड्यातील पारावर, कट्ट्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी नानाविध चर्चांना उधाण आले आहे. ( Excitement about election results in North Maharashtra )

इगतपुरीत राजकीय जाणकारांची आकडेमोड सुरु

नाशिक लोकसभा सार्वत्रिक निवणुकीसाठी गेल्या २० तारखेला मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली. इगतपुरी मतदारसंघात झालेले चांगले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार आहे, याकडे लक्ष लागले असून या निवडणुकीत कोण जिंकणार,कोण हरणार याविषयी राजकीय जाणकार आपापले अंदाज बांधत आहेत. नाशिकचा खासदार कोण याविषयी नागरिकांमध्ये उत्कंठा वाढली आहे.

जसजशी निकालाची तारीख जवळ येऊ लागली, तसतशी उत्कंठा शिगेला पोहचत चालली आहे. लोकसभा निवणुकीच्या रणधुमाळीत पारंपरिकतेप्रमाणे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या. त्यातच काही ठिकाणी महायुती आणि महाआघाडीमध्ये रुसवे फुगव्याचे सुरुवातीला नाट्य रंगले. मात्र, राजकारणात या गोष्टी घडत असतात असे म्हणून या नाट्यावर पडदा टाकला गेला.

महायुतीने सूर जुळवित मतदारांपर्यंत पोहचून प्रचाराची कोणतीही कमी ठेवली नाही. तसेच महाआघाडीच्या उमेदवारांनीही खांद्याला खांदा लावून जनतेपर्यंत प्रचार केला. दोन्ही राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभांच्या माध्यमातून प्रचाराचा धुराळा उडाला.‘लोकशाहीचा ठेवूया मान,शंभर टक्के करूया मतदान’ यासह विविध माध्यम वापरुन जिल्हा निवडणूक प्रशासनाकडूनही लोकशाहीचा स्तंभ मजबूत करण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली. (latest political news)

नाशिक लोकसभेसाठी सरासरी ७२.२४ टक्के मतदान झाले आहे. इतर निवडणुकांपेक्षा या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढलेला आहे. इतर तालुक्यांच्या म्हणजेच विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत इगतपुरी मतदार संघात ७२.२४ टक्के मतदान झाले असल्याने कोण बाजी मारणार याकडे तमाम मतदारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे

कार्यकर्ते आकडेमोडीत गुंग

नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवार हेमंत गोडसे व राजाभाऊ वाजे यांच्यातच खरी लढत झाली. दोन्हीही उमेदवार तुल्यबळ असल्याने निकालाचे सुत्र जुळवणे अवघड झाले आहे. मतदान होऊन आता १० दिवस उलटले असून काही कार्यकर्त्यांनी आपापले अंदाज बांधले आहेत.मात्र नाशिकचा खासदार कोण होणार हे गुलदस्त्यात असले तरी दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्याकडून मात्र विजयाचा दावा करण्यात येत आहे.

गाव कट्टा, पारावर चर्चा आणि पैंजा

खरे राजकारण हे गाव पातळीवर खेळले जाते. याचा प्रत्यय झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या दहा दिवसांपासून गाव कट्टा आणि पारावर लोकसभा निवडणुकीच्या चर्चा रंगल्या आहेत. कधी दुरंगी तर कधी तिरंगी लढतीतील प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता आपलाच उमेदवार निवडून येणार आहे, असा दावा करीत आहेत. त्यासाठी एकमेकांमध्ये पैजाही लावल्या जात आहेत. त्यामुळे निकाल लागेपर्यंत गाव खेड्या-पाड्यातील राजकीय वातावरण तापलेलेच राहणार आहे.

निकालानंतर गणित उघडे होणार

या निवडणुकीत कोणत्या भागातील मतदारांची मते कोणत्या उमेदवाराकडे वळली असतील, याचा अंदाजही वर्तविण्यात येऊन आपल्याला कोठून कमी-अधिक मतदान झाले असेल त्याची माहितीही गोळा करण्यात येत आहे. प्रत्येक उमेदवाराने झालेल्या मतदानाचा आपल्याला कसा फायदा होईल, यादृष्टीने विजयाची मांडणी केली असून, निकालाच्या दिवशी आकडेवारी बाहेर आल्यावरच सर्व गणिते उघड होणार आहेत. तरीही मतदान यंत्रात काय दडले असेल याची धाकधूक मात्र उमेदवारांना लागून राहीली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT