Legislative Assembly Election sakal
नाशिक

Assembly Election : सर्वच लोकप्रतिनिधींची जि. प.त लगबग; आचारसंहितेचा धसका

Nashik News : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व राजकीय पक्षांकडून सुरवात झालेली असताना, दोन महिन्यांत आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व राजकीय पक्षांकडून सुरवात झालेली असताना, दोन महिन्यांत आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आमदारांची कामे उरकण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेत आमदारांची लगबग वाढली असून, प्रशासनावर कामांसाठी पत्रांचा पाऊस पडला असल्याचे चित्र आहे. (Assembly Election)

गत अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेत सदस्य, पदाधिकारी नसून प्रशासकीय राजवट आहे. या राजवटीत ग्रामीण भागात कामे सुचविण्याचे सर्वाधिकार हे आमदारांना आहेत. त्यानुसार विविध विभागांतर्गत आमदार कामे सुचवत, त्यास मान्यता घेतात. विधानसभा निवडणुकीचा बिगुल लवकर वाजण्याची शक्यता आहे.

साधारण ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरच्या आसपास आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा विचार करता, कामे करण्यासाठी कमी कालावधी शिल्लक असल्याने आमदारांची धावपळ सुरू झाली आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली आहे, तर अर्थसंकल्प देखील सादर झालेला असल्याने विविध लेखाशीर्षकाखाली निधी प्राप्त झाला आहे. (latest marathi news)

त्यामुळे आता आमदारांकडून मतदारसंघात कामे सुचविली जात आहेत. त्यासाठी विविध लेखाशीर्षकाखाली कामे सुचविण्यासाठी आमदारांकडून प्रशासनाला पत्र दिले जात आहे. आठवडाभरात विविध विभागांतर्गत मंजूर निधीतून कामांसाठी पत्रांचा पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. आमदारांचे स्वीय सहाय्यक यांच्याकडून दररोज नवीन पत्र दिले जात असून, कामे मंजूर करण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी स्वीय सहाय्यक जिल्हा परिषदेत विविध विभागात पाठपुरावा करताना दिसत आहे.

स्वीय सहाय्यक झाले टपाली

आमदार, खासदारांकडून कामांसाठी दाखल होणारे पत्र थेट मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्य यांना दिली जात आहेत. त्यामुळे विविध आमदारांकडून प्राप्त झालेल्या पत्रांची या स्वीय सहाय्यकांना नोंद करण्याचे काम करावे लागत असल्याने स्वीय सहाय्यक टपालीचे काम करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT