Nashik Police Commissionerate esakal
नाशिक

Nashik Assembly Election : पोलिस आयुक्तालयात विधानसभा कक्ष कार्यान्वित! आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराईतांची माहिती संकलित

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याचे पडघम सुरू झाले आहेत. येत्या काही दिवसांत निवडणूक आयोगाचे विशेष पथक निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयामध्ये स्वतंत्र विधानसभा कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईसंदर्भात आयुक्तालयाकडून माहिती संकलितही केली जात आहे. (assembly hall operational in Police Commissionerate)

गणेशोत्सव, ईद ए मिलाद या उत्सवादरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची तयारी दिसून आली. आता आठवडाभरावर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. त्यावेळीही इच्छुकांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी उपक्रम राबविले जातील. तर काही इच्छुकांकडून निवडणुकीपूर्वीच शक्तिप्रदर्शनही केले जाण्याची शक्यता आहे.

या साऱ्या प्रकारात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून दक्षता बाळगली जात आहे. त्यासाठीच पोलिस आयुक्तालयात आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये स्वतंत्र विधानसभा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षांतर्गत निवडणुकीशी संबंधित कामकाजांना प्राधान्य दिले जाणार आहे. (latest marathi news)

शहर आयुक्तालय हद्दीमध्ये विधानसभेचे मध्य, पूर्व, पश्चिम आणि देवळाली अशा चार मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीच्या दरम्यान या चारही मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा, बैठका होतील. त्यात महत्त्वाचे, अतिमहत्त्वाचे बंदोबस्त तैनात करावा लागणार आहे. त्या अनुषंगाने या स्वतंत्र कक्षामार्फत नियोजन केले जात आहे.

प्रतिबंधात्मक कारवाई

पोलिस आयुक्तालयाकडून शहरातील सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात आहे. दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. आयुक्तांनी यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करीत अनेकांना तडीपार तर काहींची मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धता केली आहे. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी काही गुन्हेगारांवर कारवाईची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajeev Kumar on Media Trends: एक्झिट पोल्सचा फेक डेटा दाखवण्याचा अट्टाहास? मुख्य निवडणूक आयुक्त मीडिया ट्रेन्ड्सवर भडकले

Election Commission : पेजरचे स्फोट होतात, मग EVM कसे हॅक होणार नाहीत... निवडणूक आयोगाने दिलं उत्तर

PAK vs ENG: सईम आयूब, कामरान घुलाम या नवख्या खेळाडूंनी पाकिस्तानला सावरले; पहिल्या दिवसाअंती केल्या २५९ धावा

Baba Siddique : म्हणून शाहरुख बाबा सिद्दिकीच्या अंत्यसंस्काराला राहिला गैरहजर ; जाणून घ्या कारण

Latest Maharashtra News Updates : निकाल त्यांच्या बाजूने जात नाही, तेव्हा ईव्हीएम खराब - शिंदे

SCROLL FOR NEXT