Nashik News : जगात शांतता व मानवता प्रस्थापित करण्यासाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड नेशन (यूएन)च्या युनायटेड नेशन पीस कीपिंग फोर्स यात राज्य गुप्तवार्ता विभागाच्या नाशिकमधील सहाय्यक आयुक्त माणिक पत्की यांची निवड करण्यात आली आहे. देशभरातील ६९ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्र पोलिस दलातून निवड झालेल्या माणिक पत्की या एकमेव महिला अधिकारी आहेत. (Assistant Commissioner Manik Patki is first woman officer of Maharashtra Police Force in UN Special Forces)
जगभरातील अनेक देशांमध्ये आजही युद्ध, अन्नधान्याची कमतरता, शिक्षणाचा अभाव, देशांतर्गत गृहकलह यामुळे अशांतता आहे. अशा देशांमध्ये व तेथील नागरिकांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, तेथील जनजीवन पूर्वपदावर यावे, यासाठी युनायटेड नेशन पीस किपिंग फोर्सच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातात.
‘यूएन’च्या या विशेष फोर्सच्या माध्यमातून जगभरातील पोलिस दलातील अधिकारी वर्षभर अशा देशांमध्ये जाऊन त्याठिकाणी शांतता निर्माण करण्यासाठी सेवा बजावत असतात. ‘यूएन’च्या या फोर्समध्ये निवडीसाठी राष्ट्रीय पातळीवर देशभरातील पोलिस अधिकाऱ्यांसाठी परीक्षा घेण्यात येत असते. (latest marathi news)
२०२२-२०२४ या वार्षिक गटासाठी घेतलेल्या परीक्षेत देशभरातून ६९ पोलिस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्र पोलिस दलातील माणिक पत्की या एकमेव महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे. पत्की यांनी मुंबई, सांगली, सीआयडी, सीबीआय, नागपूर, नाशिक येथे सेवा बजावली आहे. सध्या त्या नाशिकमध्ये राज्य गुप्तवार्ता विभागात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
‘जुबा’मध्ये नियुक्ती
माणिक पत्की यांनी परीक्षेत यश प्राप्त केल्याने त्यांची ‘यूएन’च्या विशेष फोर्समध्ये एका वर्षासाठी निवड झाली आहे. त्या पूर्व आफ्रिकेतील दक्षिण सुदान या देशात ५ जूनपासून रुजू झाल्या. त्यांच्याकडे ‘जुबा’ या शहरात क्षेत्रीय अधिकारी (फिल्ड ऑफिसर) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.