Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : दुचाकीस्वाराच्या अंगावर घातली कार; कौटुंबिक वादातून घटस्फोटातील पतीला मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिखरेवाडीतील मोटवाणी रोडवर समोरून भरधाव वेगात आलेल्या कारचालकाने जाणीवपूर्वक दुचाकीला धडक दिली. त्यानंतर खाली पडलेल्या दुचाकीचालकाच्या अंगावरही कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. संशयित कारमध्ये चालकाशेजारी जखमी दुचाकीस्वाराची घटस्फोटीत पत्नी होती. याप्रकरणी संशयित कारचालक दिलीप बंडू केदार, अश्विनी दिलीप वाघ यांच्याविरोधात उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Attempt to kill husband in divorce due to family dispute )

सचिन नामदेव गामणे (४३, रा. ड्रिम मिनी सोसायटी, कलानगर, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, सदरील प्रकार २६ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. गामणे हे त्याच्या दुचाकीवरून (एमएच १५ सीएक्स १०२६) मोटवाणी रोडने त्यांच्या घरी जात होते. या रोडवरील अग्रवाल बंगल्याजवळील वळणावरून समोरून भरधाव वेगातील कार (एमएच १५ एचक्यु १६८०) आली.

कारचालक संशयित केदार व त्याच्याशेजारी गामने यांची घटस्फोटीत पत्नी अश्विनी बसलेली होती. संशयितांनी कौठुंबिक वादाच्या कारणावरून गामणे यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. त्यामुळे गामणे खाली पडले असता, चालकाने कार पुन्हा त्यांच्या अंगावर ठार मारण्याच्या उद्ेदशाने घालण्याचा प्रयत्न केला. यात त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक बैसाने हे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींचे १० साल 'बेमिसाल', एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?

Bigg Boss Marathi 5 : 'या' तारखेला पार पडणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले ? प्रेक्षकांनी ठरवली फायनलिस्टची यादी

iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

Supreme Court: आरबीआय गव्हर्नर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : मनीष सिसोदीयांनी रोहित पवार यांना भावी शिक्षणमंत्री म्हणून संबोधलं

SCROLL FOR NEXT