The JEE Advanced exam was held on Sunday, this time there was a crowd of parents and students outside the exam center at Gangapur Road. esakal
नाशिक

JEE Advance Exam : गणित, भौतिकशास्‍त्राच्या प्रश्‍नांची कसोटी; 7 केंद्रांवर दोन हजार विद्यार्थ्यांची हजेरी

JEE Advance : 'आयआयटी'मध्ये पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी आयोजित जेईई ॲडव्हान्सड परीक्षेला नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.

सकाळ वृत्तसेवा

JEE Advance Exam : 'आयआयटी'मध्ये पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी आयोजित जेईई ॲडव्हान्सड परीक्षेला नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. विविध सात केंद्रांवर घेतलेल्‍या या परीक्षेसाठी दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ९५ टक्‍यांपर्यंत विद्यार्थ्यांची उपस्‍थिती नोंदविली. दरम्‍यान गणित आणि भौतिकशास्‍त्र विषयांचे प्रश्‍न सोडविताना विद्यार्थ्यांची कसोटी लागली होती. ( Attendance of 2000 students at 7 centers for jee advanced exam )

इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी जेईई ॲडव्हान्सड परीक्षा रविवारी (ता. २६) घेण्यात आली. यापूर्वी जेईई मेन्‍स परीक्षेतून पात्र ठरलेल्‍या विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्सड परीक्षा दिली. यंदाच्‍या परीक्षेचे आयोजन आयआयटी मद्रासतर्फे केले होते. नाशिकमध्ये सात परीक्षा केंद्रांवर दोन हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षेतील गणित व भौतिकशास्‍त्र विषयाचे प्रश्‍न कठीण वाटले. चुकीच्‍या उत्तरासाठी गुणकपात असल्‍याने विद्यार्थ्यांनी सावधगिरीने उत्तरे नोंदविली. ॲडव्हान्सड

बाहेर पालकांची परीक्षा..

रविवारी (ता.२६) सकाळी नऊ ते बारा या वेळेत पेपर क्रमांक एक पार पडला. तर दुपारी अडीच ते साडे पाच या वेळेत पेपर क्रमांक दोनचे आयोजन केले होते. दोन्‍ही पेपरच्‍या दरम्‍यानच्‍या काळात विद्यार्थ्यांनी केंद्रात बसून उजळणी करण्यावर भर दिला. तर अनेक पालक संपूर्ण परीक्षा कालावधी परीक्षा केंद्राबाहेर ठाण मांडून होते. तप्त उन्‍हापासून बचाव करताना पालकांनादेखील बाहेर एकाप्रकारे परीक्षाच द्यावी लागली. (latest marathi news)

ड्रेसकोडच्या विद्यार्थ्यांना सूचना

नीट परीक्षेच्‍या धर्तीवर जेईई ॲडव्हान्सड परीक्षेसाठी देखील ड्रेसकोड निश्‍चित केलेला होता. त्‍यानुसार विद्यार्थिनींना कानातील झुमके किंवा इतर दागिने तर मुलांना घड्याळ, चैन, ब्रेसलेट किंवा इतर वस्‍तू वापरावर बंदी होती. तसेच कुठल्‍याही प्रकारच्‍या गॅझेटला प्रतिबंध केलेला होता. परीक्षा केंद्रात दाखल होताना विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्यात येत होती.

९ जूनला निकाल

परीक्षेच्‍या पुढील टप्यात विद्यार्थ्यांना त्‍यांनी नोंदविलेल्‍या प्रतिसादाचा तपशील येत्‍या ३१ मेस उपलब्‍ध करून दिला जाणार आहे. तर ऑनलाइन पद्धतीने उत्तरतालिका (ॲन्सर की) प्रसिद्धी २ जूनला केली जाईल. प्रारूप स्वरूपाच्या उत्तरतालिकेबाबत प्रतिसाद नोंदविण्यासाठी २ व ३ जूनची मुदत दिली जाईल. यानंतर ९ जूनला सकाळी दहाला अंतिम उत्तरतालिका (फायनल ॲन्‍सर की) व त्‍यासोबत परीक्षेचा निकाल देखील जाहीर केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT