Atul Londhe, state chief spokesperson of the National Congress esakal
नाशिक

SAKAL Exclusive : संवेदनशील प्रकरणांत भाजपचे मौन धोकादायक; राष्ट्रीय काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचे मत

सकाळ वृत्तसेवा

निखिल रोकडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शेतकरी आंदोलनात ७२५ शेतकरी शहीद होऊन देखील आंदोलनकर्त्यांच्या पदरी निराशा आली. या सर्व विषयांना भारतीय जनता पार्टी म्हणजेच नरेंद्र मोदी,अमित शहा हे पूर्णपणे जबाबदार आहेत. अनेक अनैतिक घटकांना मोदी शहांनी पाठबळ दिले.देशाची जनता त्यांना कदापी माफ करणार नाही. एकप्रकारे देशावर त्यांनी उगवलेला हा सूड आहे.

या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित आहे व काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीच्या माध्यमातून देश विकासाच्या दृष्टीने नवीन वाटचाल करेल,असे मत राष्ट्रीय काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. यूपीएससी मार्फत आयएएसपदी नियुक्ती झाल्यानंतर जॉइंट सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचण्यासाठी सोळा वर्षे लागतात.

मात्र,केंद्रातील भाजप सरकारने पक्षाशी जवळीक असणाऱ्या १४० व्यक्तींची थेट जॉइंट सेक्रेटरीपदी नियुक्ती केली. याचाच अर्थ गोरगरीब,मागासवर्गीय समाजातील गुणवत्ता असलेल्या तरुणांना मोठ्या पदांवर नोकरी मिळू नये,यासाठी केलेली ही व्यवस्था आहे. म्हणजेच आरक्षण संपविण्याच्या दृष्टीने भाजप वाटचाल करत असल्याचे लोंढे यांनी स्पष्ट होते.

देशातील सर्वांधिक रोजगार देणाऱ्या सेक्टरमधील एअरलाइन्स,रेल्वे, संरक्षण ही खाती विकण्याचे काम केंद्र सरकारने सुरु केले असल्याचे लोंढे यांनी सांगितले.पूर्वी पक्षांतरे व्हायची,मात्र ती वैयक्तिक पातळीवर मर्यादीत होती.केंद्रीय तपास यंत्रणांचा (ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स) धाक दाखवून खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये पाठवण्याची धमकी देऊन पक्षांतरे भाजपने घडविली.

राज्याच्या राजकारणात पक्ष हायजॅक करुन चिन्ह पळविण्याचा प्रकार देशात प्रथमच घडला.भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षांनीच आम्हाला प्रादेशिक पक्षांना संपवायचे असल्याची भूमिका जाहीर केली आहे.मूलतः भाजप हा परजीवी पक्ष आहे.ज्या-ज्या राज्यात भाजप गेला तेथील प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम भाजपने केले. भाजपला महाराष्ट्रात आजवर जे यश मिळाले,त्यात सर्वांत मोठा वाटा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. (latest marathi news)

तीच शिवसेना भाजपने चिन्हासह दुसऱ्याच्या हाती सुपूर्द केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे,की आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढविण्यावर काँग्रेस ठाम आहे. कारण सध्या प्रत्येक समाजाला आपल्या वाट्याचे कोणीतरी ओढून घेत आहे, ही भावना प्रबळ झाली आहे.आरक्षणाची मर्यादाच ५० टक्क्यांवर गेल्यास कुणाच्याही वाट्याचे घेण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.

पोळी जर मोठी असेल तर सर्वांचे पोट भरते हे धोरण काँग्रेसने स्वीकारलेले आहे. धर्माच्या भावनेवर लोकांना भडकविणे हा एकमेव अजेंडा भाजपचा खास करून मोदी-शहांचा राहिलेला आहे.राजस्थानात कन्हैयालाल याला मारणारे आरोपी ही भाजपचे कार्यकर्ते होते.

३७० कलमाबद्दल संपूर्ण देश आमच्या बरोबर आहे,असे भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मग लोकसभा निवडणुकीत श्रीनगरबरोबरच खोऱ्यातील दोन जागा भाजप का लढवत नाही याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे, असे लोंढे यांनी नमूद केले.

भाजपची जायची वेळ आलेली आहे

भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी या विषयांसंदर्भात केंद्र सरकारच्या पातळीवर आलेले अपयश हा महाविकास आघाडीचा प्रचारातील प्रमुख मुद्दा आहे. महिला अत्याचारासंदर्भात असंवेदनशीलता सतत दिसून आलेली आहे. कुलदीप सेंगर,ब्रिजभूषण,पुलकित आर्या,मणिपूर,इतिहासातील सर्वांत विकृत चेहरा प्रज्वल रेवन्ना अशा शेकडो प्रकरणांत सत्ताधारी भाजपाने स्वीकारलेले मौन धोकादायक आहे. त्यामुळे भाजपची जायची वेळ आलेली आहे,असे लोंढे यांनी व्यक्त करीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर विविध विषयांवर लोंढे यांनी परखड भूमिका स्पष्ट केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT