Manmad Bazar Samiti esakal
नाशिक

Manmad Bazar Samiti : मनमाड बाजार समितीत लिलाव बंद! लेव्ही कापण्यास व्यापाऱ्यांचा नकार, आज पुन्हा बैठक होणार

Nashik News : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काम करणारे हमाल व मापारी यांची तोलाई (लेव्ही) कपात करण्याचा वाद पुन्हा उफाळला आहे. यावरूनच मनमाड बाजार समितीचे लिलाव दोन दिवसांपासून बंद आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काम करणारे हमाल व मापारी यांची तोलाई (लेव्ही) कपात करण्याचा वाद पुन्हा उफाळला आहे. यावरूनच मनमाड बाजार समितीचे लिलाव दोन दिवसांपासून बंद आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी (ता. २५) सभापती दीपक गोगड यांनी व्यापारी व हमाल यांची एकत्रित बैठक घेतली. परंतु, ती बैठक निष्फळ ठरल्याने शुक्रवारी (ता. २६) पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे. (Manmad Bazar Samiti)

जिल्ह्यातील कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी लेव्हीच्या मुद्यावरून एप्रिलमध्ये जवळपास सर्व बाजार समित्या बंद केल्या होत्या. या प्रकरणी थेट जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे बैठक होऊनही त्यावर तोडगा निघाला नाही. प्रशासनाने व राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करून हा विषय भिजत ठेवला. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २४) व्यापाऱ्यांनी

हमाली व तोलाई कपात करण्यास विरोध दर्शवत लिलाव बंद केले आहेत. या बाजार समितीत मंगळवारी (ता. २३) ९६ वाहनांमधून अडीच हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याला साधारणत: एक हजार ते दोन हजार ९३० रुपये प्रतिक्विंटल म्हणजेच सरासरी दोन हजार ७०० रुपये इतका दर मिळाला.

उन्हाळ कांद्याची आवक कायम असताना व्यापाऱ्यांनी कांदा भुसार मालाचे लिलाव बंद ठेवल्याने दोन दिवसांत पाच हजार क्विंटल कांद्याचा लिलाव झालेला नाही. तसेच, इतर धान्यादी मालाचा लिलावच न झाल्याने त्याचे व्यवहार ठप्प झाले आहेत. यावर बाजार समितीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, अद्याप यश आलेले नाही. (latest marathi news)

इतर ठिकाणीही ‘लेव्ही’चा विषय चर्चेत येण्याची शक्यता असली, तरी गुरुवारी इतरत्र लिलाव पूर्ववत सुरू असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात सद्यस्थितीला ८० ते ९० हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होत आहे. त्याला सरासरी दोन हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत असल्याचे दिसून येते.

"राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी उपस्थित झालेला हा विषय सोडविलेला नाही. त्यामुळे व्यापारी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत; तर माथाडी कामगारांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. या दोघांचा समन्वय साधण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. लवकरच यातून तोडगा निघेल आणि शनिवारपासून लिलाव सुरू होतील, अशी अपेक्षा आहे." - दीपक गोगड, सभापती, मनमाड बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT