Audit of city hoardings after 3 years esakal
नाशिक

Nashik News : शहरातील होर्डिंग्जचे 3 वर्षांनी ऑडिट; राज्य शासनाला कार्यपूर्ती अहवाल सादर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील होर्डिंग्जचे दर तीन वर्षांनी परवाना नूतनीकरण करताना स्ट्रक्चरल ऑडिट देखील बंधनकारक केले जाणार असल्याचे महापालिकेने शासनाला सादर केलेल्या कार्यपूर्ती अहवालात नमूद केले आहे. मुंबईतील घाटकोपर येथील छेडा नगर येथे होर्डिंग कोसळून सतरा जणांचा मृत्यू झाला होता. (Audit of city hoardings after 3 years)

या दुर्घटनेनंतर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यातील सर्व महापालिकांना होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देताना होर्डिंग्ज संदर्भातील अहवाल तातडीने राज्य शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर महापालिकेच्या जाहिरात व परवाना विभागाकडून शहरातील सर्व होर्डिंगचे फेरसर्वेक्षण करण्यात आले.

यात राज्य परिवहन महामंडळाचे सीबीएस व पंचवटी तसेच महामार्ग बस स्थानक परिसरात १३ अनधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली होती. मायको सर्कल येथे बीएसएनएलचे अवैध होर्डिंगही तातडीने हटविण्यात आले. शासकीय जागांवरील होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. (latest marathi news)

जाहिरात व परवाना विभागाने आयुक्तांच्या सूचनेनुसार होर्डिंग संदर्भातील कार्यपूर्ती अहवाल शासनाला सादर केला. त्यात दर तीन वर्षांनी होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कार्यपूर्ती अहवालात महत्त्वाचे

- जून २०२३ मध्ये शहरातील सर्व ८६३ होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल ऑडिटची प्रक्रिया पूर्ण.

- धोकादायक स्थितीतील १६ होर्डिंग्ज उतरविले, ४१४ होर्डिंग्जची किरकोळ दुरुस्ती.

- होर्डिंग्जवर छिद्रे, एकसमान होर्डिंग्ज दिसण्यासाठी झिंक प्रायमर मारण्याच्या उपाययोजना.

- दर तीन वर्षांनी होर्डिंग्ज स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक.

- नवीन १८१ होर्डिंग्जच्या जागा सूचविण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

IND vs NZ 1st Test : आता आमची सटकली...! Virat Kohli - सर्फराज खान यांची तुफान फटकेबाजी; भारताचा न्यूझीलंडवर पलटवार

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील धार्मिक संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपने रणनीति आखली

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

SCROLL FOR NEXT