नाशिक : नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने आयोजित टेबल टेनिस स्पर्धेत आवेश केवलरामानी याने तिहेरी मुकुट पटकावला. १३ वर्षाखालील मुलांच्या गटात आवेशने राघव महालेचा ११-९, ११-१३, ११-५ व ११-९ असा ३-१ ने पराभव करून विजेतेपद मिळविले. १५ वर्षाखालील मुलांच्या गटात आवेशने अवी मोदीचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत १०-१२, ११-९, ११-६, ११-१३, व १२-१० असा ३-२ ने पराभव करून दुसरे विजेतेपद आपले नावे कोरले. (Avesh Kewalramani wins triple crown in district ranking table tennis tournament )
तिसऱ्या १९ वर्षाखालील मुलांच्या गटात आवेशने अंतिम फेरीत अन्वय पवार याचा चुरशीच्या झालेल्या अटीतटीच्या सामन्यात ११-८, ४-११, १३-११, ३-११, व ११-७ असा ३-२ ने पराभव करून तिसरे अजिंक्यपद आपल्या नावे केले. ११ वर्षाखालील मुलींच्या गटात केशिका पुरकर हिने विजेतेपद तर अमृता गोवर्धने हीने उपविजेतेपद पटकावले. तसेच १५ वर्षाखालील मुलींच्या गटात केशिका पुरकर हिने सान्वी डहाणूकर हीचा ३-० ने सहजरित्या पराभव करीत दुहेरी मुकुटाचा मान पटकावला. (latest marathi news)
११ वर्षाखालील मुलांच्या गटात ओम रेडकर याने अंतिम सामन्यात विआन मेघनानी याचा ५-११, ११-९, ११-८, ९-११ व १३-११ असा ३-२ने पराभव करून विजेतेपद मिळविले. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात हर्ष बोथरा याने आवेश केवलरामानी याचा ११-९, ८-११, ११-७ व ११-७ असा ३-१ पराभव करुन या गटाचे अजिंक्यपद आपल्या नावे केले. पुरुष एकेरीत अजिंक्य शिंत्रे याने अंतिम सामन्यात लोवित चांदुरकर याचा ११-५, ९-११, ११-४, ९-११, ११-९ व १४-१२ असा ४-२ ने पराभव करून विजेतेपद पटकावले.
१९ वर्षाखालील मुलींच्या गटात साखळी पद्धतीने सामने घेण्यात आले. त्यात मिताली पुरकर हीने विजेतेपद तर स्वधा वालेकर हिने उपविजेतेपद पटकावले.
विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष मिलिंद कचोळे, सचिव राजेश भरवीरकर आदींनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
स्पर्धा यशस्वितेसाठी शेखर भंडारी, अभिषेक छाजेड, सुहास आघारकर, पुरुषोत्तम आहेर यांनी प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.