crop loan sakal
नाशिक

नाशिक : पीककर्जासाठी बँकेकडून टाळाटाळ

नांद्रा बँक ऑफ बडोदा शाखेतील प्रकार; कार्यवाहीची मागणी

राजेश नागरे

नांद्रा: येथील बँक ऑफ बडोदा शाखेत पीककर्जासाठी टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. येथील शेतकरी एकत्र कुटुंबकर्त्या सुमनबाई पाटील यांनी बँक ऑफ बडोदा शाखेतून दोन ते तीन वेळा पीककर्ज घेतले होते. २०२० मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळण्यास अल्पभूधारक असतानाही ऑनलाइन प्रक्रिया करताना इतर खात्याला हे खाते जोडल्यामुळे कर्जमाफी घेण्यासाठी दोन वर्षे निघून गेली.

त्यातच कर्जमाफी घेतलेल्या लाभार्थ्यांना फक्त ५० टक्के कर्ज योजना आली असता, कोरोना काळ असल्याने २०२० नंतर पीककर्ज घेतले नाही. सातबारावर कोणत्याही प्रकारचा बोजा नाही. लाभार्थ्याचा ‘सिबिल’ स्कोरही चांगला असतानाच शाखा व्यवस्थापक दीपक टोंगे टाळाटाळ करीत असल्याची तक्रार शेतकऱ्याने केली आहे. टोंगे यांच्याकडे पीककर्ज मागणी केली. त्यावर बँक व्यवस्थापक टोंगे यांनी सांगितले, की माझ्याकडे अर्ज करा, एकत्र कुटुंबकर्त्याला बँकेच्या पॉलिसीनुसार पीककर्ज देता येत नाही. वर आमच्या वकिलांशी बोलून यावर काय अभिप्राय येतो, तेव्हा मी आपल्याला लेखी सांगेल. आजपर्यंत कर्ज मिळत होते. सातबारावर एकच नाव असतानाच शाखा व्यवस्थापक मनमानी करीत आहेत. अशा मुजोर शाखा व्यवस्थापकावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत अनेक ग्राहक पात्र असतानाही शाखेतून कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

बँकेच्या पॉलिसीनुसार पीककर्ज देताना एचयूएफ हिंदू एकत्रित कुटुंबाला पीककर्ज देता येत नाही. तुमचे कर्जप्रकरण मी वरिष्ठांना पाठवेल. त्यावर काय अभिप्राय येतो, तेव्हा तो मी आपल्याला देईल.

-दीपक टोंगे, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ बडोदा, नांद्रा

मी एक सैन्यदलातील पेन्शनर शेतकरी आहे. आजपर्यंत मी बँक ऑफ बडोदा शाखेतून पीककर्ज घेतले आहे. तेव्हाही नोंद एकत्र कुटुंब कर्ता होती. मात्र, तेव्हा पीककर्जाला अडचणी आल्या नाहीत. सातबारा उतारा कोरा असताना, बँक व्यवस्थापकांकडून टाळाटाळ केली जात आहे.

-सुमनबाई पाटील, शेतकरी, नांद्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT