chhagan bhujbal esakal
नाशिक

Baba Siddique Murder: सिद्दिकींची हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंगच, पोलिसांना फ्री हॅन्ड द्या; भुजबळांची मागणी, जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीही

सकाळ वृत्तसेवा

येवला : अवघ्या दहा- वीस हजारांत ही पोरं हत्या करतात, त्यांना बंदूक दिली जाते, संबंधित व्यक्तीचा फोटो दिला जातो आणि ते रेकी करतात. त्यांना बाबा सिद्दिकी हे मंत्री होते की आमदार होते याचा पत्ताही नसतो, असे सांगत हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे. पोलिसांना फ्री हॅन्ड दिले पाहिजेत. मीसुद्धा गृह खाते सांभाळले आहे. माझ्या काळातही अशी परिस्थिती मुंबईत उद्‌भवली होती, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. (demand of chhagan Bhujbal over baba siddique murder)

रविवारी (ता. १३) येथे पत्रकार परिषदेत भुजबळांनी भूमिका मांडली. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यावर भुजबळांनी गृह खात्यावर पत्रकार परिषदेत ताशेरे ओढले. ते म्हणाले, की बाबा सिद्दिकी हे काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते. या हत्येत राजकारणाचा काहीही संबंध नाही.

सिद्दिकींची हत्या व्यवहार वा खंडणीतून झाली असावी, असा कयास व्यक्त करीत भुजबळ यांनी पोलिसांनी धमक्यांसंदर्भात तपास करायला हवा. आज मुंबई पोलिसांसाठी हे आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भायखळा येथील तालुकाप्रमुखांचीही निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांनाही मारेकरी ठार करू, असे गेल्या काही दिवसांपासून सांगत असताना पोलिसांनी काहीच केले नाही. (latest marathi news)

जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीही

बाबा सिद्दिकी यांना धमक्या येत होत्या, अशा बातम्या आल्या. त्यांना सरकारने वाय दर्जाची पोलिस सुरक्षा दिली होती. सुरक्षा दिल्यावर पोलिसांचे काम संपले, कर्तव्य संपले असा सवाल करीत धमक्या कुठून आल्या, कुणी दिल्या होत्या, याचा तपास पोलिसांनी का केला नाही, असे सांगत मी गृहमंत्री असताना मुंबईत असे प्रकार उद्‌भवले होते.

मी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पोलिसांना फ्री हँड दिला. मुंबई पोलिसांनी मग अतिरेक्यांसह सर्वांना वठणीवर आणले, हा इतिहास आहे. त्यामुळे ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही, तर मुख्यमंत्र्यांचीही आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.

मनोज जरांगेंचे स्वागतच

मनोज जरांगे आज येवल्यात येत असून, त्यांचे स्वागत असल्याचे म्हणत भुजबळ यांनी शासनाच्या ३० कोटी रुपयांच्या विकासातून आपण साकारलेल्या मुक्तिभूमीवर जरांगे-पाटील दर्शन घेताहेत, आनंद आहे. मी कधीही जातीभेद केला नाही, असे सांगताना भुजबळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीत निवडून आलेल्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत, असे सांगत जरांगे-पाटील यांना फुले, शाहू, आंबेडकरांवरून टोला लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी; गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु

T20 Emerging Teams Asia Cup: तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पाकिस्तानला भिडणार! जाणून घ्या भारताचं वेळापत्रक

Aishwarya & Abhishek Divorce Rumors : अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवा पुन्हा चर्चेत ? हा व्हिडीओ ठरला कारण

Raj Thackeray On Toll Waiver: टोलमाफीच्या निर्णयावर राज ठाकरेंनी का व्यक्त केली शंका? मुंबईकरांसाठी सरकारकडे काय केली मागणी?

Latest Maharashtra News Live Updates: देवभूमी उत्तराखंडचे मूळ स्वरूप अबाधित राहिले पाहिजे- पुष्कर सिंह धामी

SCROLL FOR NEXT