Subhash Bhamre, Shobha Bachhao esakal
नाशिक

Baglan Assembly Constituency : मतदानवाढीचा फटका भाजपला बसण्याची चिन्हे

अंबादास देवरे

Assembly Constituency : बागलाण विधानसभा मतदारसंघात या वेळी मतदानात ०.२५ टक्क्यांनी झालेली वाढ खूप मोठी नसली, तरी याचा फटका भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारास बसेल, अशी चिन्हे बागलाण तालुक्यात दिसत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेस उमेदवाराने मारलेली मुसंडी एकच चर्चेचा विषय बनला आहे. (Baglan Assembly Constituency)

खासदार डॉ. सुभाष भामरे यांची ही तिसऱ्यांदा निवडणूक असली, तरी बागलाणमध्ये भाजपची खरी मदार असलेले आमदार दिलीप बोरसे यांनी गेल्या पाच वर्षांत भरून काढलेला विकासकामांचा अनुशेष आणि त्यांचे तालुक्यात पसरलेले नेटवर्क यामुळेच मताधिक्य टिकण्याची शक्यता भाजपकडून वर्तवली जात आहे. तालुक्यात काँग्रेसचे अस्तित्व गेल्या दहा वर्षांत धूसर झाले असले, तरी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी भाजपपुढे आव्हान उभे केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी आमदार दीपिका चव्हाण व संजय चव्हाण दांपत्याची संघटनात्मक रणनीती, नव्या दमाचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. अनिल पाटील यांचे संघटन, शिवसेना (उबाठा) पक्षच्या जुन्या जाणत्या नेत्यांची दमदार साथ यामुळे निवडणुकीतील गणिते बदलली आहेत. लोकसभा निवडणूक जणू काही विधानसभेची रंगीत तालीमच होती, असे चित्र उभे करण्यात आजी-माजी आमदार यशस्वी झाले.

काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या ‘एन्ट्रीमु’ळे या वेळी आपले गणित चुकते की काय, या शंकेने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे; तर कांद्याची निर्यातबंदी, वाढलेले निर्यातशुल्क, शेतमालाचे घसरते भाव, कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांची नाराजी यामुळे काँग्रेसला विजयाची आशा आहे. बागलाण तालुक्यातील २८८ मतदान केंद्रांवर ६४.२५ टक्के मतदान झाले.

प्रत्येक निवडणुकीत दुपारी मतदानाचा वेग मंदावतो. मात्र, ४३-४५ अंश सेल्सिअस तापमानातही टक्केवारीचे सातत्य टिकून होते. धनशक्तीचा प्रभाव वाढल्याने नेमके कोण निवडून येईल, याबाबत कमालीची उत्सुकता पसरली आहे. थेट मतदान केंद्राच्या जवळपास दुपारनंतर कॅश काउंटरच सुरू झाल्याने मतदारांमध्ये चढाओढ दिसत होती. उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. (latest marathi news)

गेल्या वेळी डॉ. भामरे यांच्या विजयाबाबत शंका नव्हती. मात्र, विजयाच्या ‘हॅट्‌ट्रिक’वर असतानाही बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे स्टार प्रचारकाची एकही जाहीर सभा होऊ शकली नाही; तर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करून भाजप उमेदवारासमोर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत खरे आव्हान उभे राहिल्याचे चित्र आहे.

माजी आमदार दीपिका चव्हाण व संजय चव्हाण दांपत्याने येथील मराठी शाळेतील मतदान केंद्रावर गळ्यात कांद्याची माळ घालून मतदानाचा हक्क बजावला. सटाणा शहर व तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर नावे सापडत नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही नावे न सापडल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

सकाळी अकरापर्यंत १८.२५ टक्के मतदान झाले. दुपारी तीनपर्यंत मतदानात ३७.६९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सायंकाळी पाचपर्यंत तालुक्यात ४७.०१ टक्के मतदान झाले होते. त्यात ७४ हजार ६९४ पुरुष; तर ६१ हजार ४८३ महिला अशा एकूण एक लाख ३६ हजार १७७ मतदारांनी हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या सटाणा शहरातील मतदानावर भाजपची भिस्त आहे.

शहरात ७० टक्के मतदारांपर्यंत मतदार स्लिपा पोहोचल्या नसल्याचे सिद्ध झाले. निवडणूक आयोगाने प्रत्येक केंद्रावर संगणक किंवा लॅपटॉपद्वारे मतदारांची नावे शोधण्याची व्यवस्था करण्याच्या मागणीने पुन्हा डोके वर काढले आहे. महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे हे हॅट्‌ट्रिकच्या उंबरठ्यावर असून, लोकसभा निवडणुकीतील मताधिक्य घटणार नसल्याचा दावा भाजपने केला असला, तरी डॉ. भामरे व डॉ. बच्छाव यांच्यात अटीतटीचा सामना होईल, असे चित्र आहे.

२०१९ ची निवडणूक

डॉ. सुभाष भामरे (भाजप)- १,१७,९५४ मते

कुणाल पाटील (काँग्रेस)- ४५,७०१ मते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT