Balasaheb Thorat  esakal
नाशिक

Balasaheb Thorat : इंडिया आघाडीला अनुकूल वातावरण : बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब जनता गेल्या दहा वर्षात नागवली गेली आहे. कांद्याने शेतकऱ्यांचा वांधा केला. कांद्यावर बोलणाऱ्यांची जय श्रीराम घोषणा देऊन वेळ मारून नेण्यात येत आहे. राम आमच्या अंतकरणात आहे, आम्हीही रोज पूजाअर्चा करतो. मात्र निवडणुकीत विकासकामे व समस्यांवर चर्चा व्हायला हवी. राज्यात इंडिया आघाडीला अनुकूल वातावरण असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.(Balasaheb Thorat)

येथील बालाजी लॉन्समध्ये आघाडीच्या कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (ता.१७) रात्री झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. श्री. थोरात म्हणाले, की विरोधी उमेदवारांना आपले मंत्रीपद टिकविता आले नाही. दहा वर्षात त्यांनी फिरकून पाहिले नाही. शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या नाहीत.

शेतकरी सुखी तर देश सुखी, भाजपच्या राजवटीत मात्र उलटी स्थिती आहे. शेतकऱ्यांचे दहा महिने आंदोलन चालले. यात ७०० शेतकरी मृत्युमुखी पडले. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना एकदाही भेटले नाही. राज्यातील उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढत आहे. केंद्रातील सरकार धनदांडग्यांचे सरकार आहे.

भाजपचा संविधान बदलण्याचा डाव आहे. कायद्याचे राज्य आणण्यासाठी कॉंग्रेसच्या साथ द्या, असेही थोरात यांनी सांगितले. उमेदवार डॉ. बच्छाव म्हणाल्या, केंद्रातील मोदी शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. सर्वत्र बेरोजगारी वाढली आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवू. (latest marathi news)

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. शेतीमालाला रास्त भाव मिळवून दिला जाईल. बि-बियाणे, खते आदींवर १८ टक्के जीएसटी आकारला जात आहे, तो रद्द केला जाईल. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आदींच्या मानधनात दुपटीने वाढ करू, असे बच्छाव यांनी सांगितले.
याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती विनोद चव्हाण, कॉंग्रेस नेते प्रसाद हिरे, शिरीष कोतवाल यांची भाषणे झाली.

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, राजाराम पानगव्हाणे, संजय हिरे, राजेंद्र भोसले, देवराज गरुड, दगाबापू निकम, शरद खैरनार, विनोद चव्हाण, राजाराम जाधव, कैलास तिसगे, शरद आहेर, अरुण देवरे, रामा मिस्तरी, जितेंद्र देसले, संजय निकम, पवन ठाकरे, अशोक आखाडे, रवींद्र सूर्यवंशी आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT