Nashik News : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचा चारा दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक करण्यास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बंदी घातली आहे. चारा वाहतुकीवर प्रांत अधिकाऱ्यांसह पोलिसांनीही नजर ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवारी (ता.२१) जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाईचा आढावा घेतला. (Nashik Ban on taking fodder marathi news)
जिल्ह्यातील वनविभागाच्या क्षेत्रावरील ५७ हजार ११४ टन चाऱ्यास अन्य ठिकाणाचा चारा नाशिक जिल्हातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये बंदी घातली होती. यानंतरही भिवंडी, गुजरातसह अन्य जिल्ह्यात चाऱ्याची वाहतूक झाली, अशी माहिती पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी टंचाई आढावा बैठकीत दिली.
जिल्ह्यातील जनावरांसाठी महिन्याकाठी १ लाख ८० हजार ८०० टन चाऱ्याची गरज भासते. ऑगस्ट २०२३ मध्येच पशुसंवर्धन विभागाने टंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेता पाणीसाठा असलेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दीड हजार रुपयांच्या मर्यादेत बियाणे उपलब्ध करून देत चारा लागवड केली. त्याचा चांगला फायदा सध्या चारा उपलब्धतेवर दिसत आहे.
नांदगाव, मालेगाव, नाशिक व सिन्नर या चार तालुक्यांमध्ये पशुधनावर चारा टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. चाऱ्याची व्यवस्था करण्यात पशुपालकांची दमछाक होत आहे. दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातून चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास मनाई असतांनाही चारा जिल्हाबाहेर जात आहे.
त्यामुळे शेतकरी व पशुपालकांना चाऱ्यासाठी सोयाबीन, तूर व हरभरा पिकांचे कुट्टीवरच अवलंबून राहावे लागत आहे. तुरीच्या कुटार सध्या चार-पाच हजार रुपये ट्रॅक्टर ट्रॉलीप्रमाणे विक्री होत आहेत. हरभरा कुटाराचे दर सुद्धा जास्त आहेत. त्यामुळे जनावरांसाठी चारा मिळणे कठीण झाले.
बंदी नावापुरतीच
अनेक शेतकऱ्यांनी बाहेरगावी धाव घेत चारा खरेदी सुरू केली आहे. पण तेथेही बंदी असल्याने तो चारा जिल्ह्यात आणणे अवघड होत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात चोरट्या मार्गाने जात आहे. त्यामुळे ही बंदी केवळ नावालाच असल्याचे या बैठकीतून समोर आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.