A plaque placed in the area esakal
नाशिक

Nashik News : 'अरे कधी होते, ही भिंत पूर्ण...गढी पडल्यावर का? श्री शितळादेवी भक्त मंडळ ट्रस्टतर्फे फलकबाजी

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : काझीगढी दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी गढीच्या काठावरील तीन घरे कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर पुन्हा गढी प्रकाश झोतात आली आहे. घटनेनंतर प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी श्री शितळादेवी भक्त मंडळ ट्रस्टतर्फे 'अरे कधी होते, हि भिंत पूर्ण.....गढी पडल्यावर का ? ' अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे. (banner display by Shitladevi Trust kaji gadhi wall construction)

धोकादायक काझीगढीला संरक्षण भिंत बांधण्याचे आश्वासन महापालिका, जिल्हा प्रशासन, शासकीय अधिकारी, मंत्री महोदय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून गेल्या ३० वर्षापासून दिले जात आहे. प्रत्यक्षात अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात घडी कोसळण्याच्या घटनांमध्ये सातत्य दिसून येत आहे.

महिनाभरात पाच घरे कोसळली आहे. यापूर्वीही दरवर्षी अशा घटना घडल्या आहे. मात्र, प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. प्रत्येक पावसात येथील लोक भीतीच्या सावटात राहतात. त्यामुळे संरक्षण भिंत कधी उभी राहणार असा प्रश्न येथील नागरिकांना भेडसावत आहे. (latest marathi news)

फलक ठरतो लक्षवेधी

पाच दिवसांपूर्वी गढी काठावरील तीन घरे कोसळली संतप्त झालेल्या रहिवासी यांनी प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनास जाग येईल का. याकडे लक्ष वेधणारा फलक गढी परिसरात लावण्यात आला आहे.

श्रेय घेणारे गेले कुठे

काही वर्षांपूर्वी गढीच्या संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर झाला होता. यानंतर काही लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याचे श्रेय घेत परिसरात स्वतःची छायाचित्र असलेले मोठमोठे फलक लावले. यानंतर रहिवाशांकडून वाहवा मिळवली. प्रत्यक्षात मात्र, कामाला सुरुवात झाली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: महाराष्ट्र गिळायचा प्रयत्न केला तर... विरोधकांना थेट इशारा, नागपुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Akshay Shinde: कळवा रुग्णालयातून मृतदेह पाठवल्यापासून ते दफनविधीपर्यंत नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण प्रकरण...

"त्याने माझी फसवणूक केली", युट्युबर फ्लाईंग बिस्ट म्हणजेच गौरव तनेजाच्या पत्नीचा कथित व्हिडीओ व्हायरल, "माझ्या मुलांची आई..."

Steve Smith पुन्हा झाला वनडे कर्णधार, पण मिचेल मार्शने का घेतली माघार? जाणून घ्या कारण

Latest Maharashtra News Live Updates: ...तर तुम्ही अहमदशाह अब्दाली आहात, ठाकरेंचा शाहांवर घणाघात

SCROLL FOR NEXT