निखिल रोकडे : सकाळ वृत्तसेवा
Nashik Tattoo Studio Business : सध्या ‘टॅटू कल्चर’ मोठ्या प्रमाणात तरुणाईला भुरळ घालताना दिसत आहे. विशेष करून सर्वच वयोगटातील वर्ग टॅटूकडे आकर्षित होत आहे. सिम्बॉलिक, कपल, मेसेजिंग, मोटिव्हेशनल, भक्ती, इन्स्पिरेशन अशा प्रकारचे भावना व्यक्त करणारे टॅटू अनेकांवर बघावयास मिळतात. टॅटूची मागणी असणारे व आर्टिस्ट यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे यामधून रोजगार ही उपलब्ध झाला आहे. टॅटू कल्चर झपाट्याने वाढत असून, फक्त नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरातच जवळपास शंभरहून अधिक आर्टिस्टचे स्टुडिओ आहेत. (Nashik more than hundred tattoo studios in Gangapur Road news)
देशात ऐतिहासिक काळापासून टॅटू बघावयास मिळतात. पूर्वी त्याच गोंदण अशा स्वरूपात बोलले जायचे. आपले जीवन संपल्यानंतर आपण बरोबर काहीतरी घेऊन गेले पाहिजे अशी भावना त्याकाळी होती म्हणून गोंदण केले जात. विशेष करून त्यावेळी गोंदण कपाळावर किंवा हातावर केले जात.
चीन देशात तर गुन्हेगार प्रवृत्तीची असलेल्या व्यक्तीची पटकन ओळख पटावी म्हणून त्याच्यावर टॅटू काढले जात. गोंदण ही कला पूर्वी फक्त ग्रामीण भागांपूर्तीच मर्यादित होती, मात्र गोंदण या कलेचेच आधुनिक स्वरूप टॅटू आर्ट होय. टॅटू हे सौंदर्य खुलविण्यासाठीच नव्हे तर काही त्यामध्ये कव्हरअप टॅटू एक प्रकार आहे.
यामध्ये आपल्या जखमा उदाहरणार्थ भाजलेल्या या कव्हर करून लपविण्यासाठी सुद्धा टॅटू काढला जातो. कायमस्वरूपी व तात्पुरत्या असे टॅटूचे दोन प्रकार होय. कायमस्वरूपी टॅटू काढायचा असेल तर लेजरने करावा लागतो व तो खर्चिक असतो. शहराबरोबरच ग्रामीण भागातही टॅटूची फॅशन झपाट्याने पसरत आहे.
खासकरून युवा पिढीमध्ये टॅटूची क्रेझ प्रचंड आहे. मात्र सर्व वयोगटातील महिला व पुरुष अंगावर टॅटू काढतात. अंगावर केवळ कोणताही टॅटू काढण्यापेक्षा आपल्या व्यक्तिमत्त्वाशी- व्यवसायाशी निगडित टॅटू काढण्याचा ट्रेंड सध्या युवा पिढीत आहे.
अनेकदा प्रेरणादायी टॅटू काढला जातो. काही तरुण-तरुणी केवळ अनुकरण करण्यासाठी टॅटू अंगावर काढतात. पण काही युवक-युवती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर पडेल असे टॅटू अंगावर काढतात. काहीजण आपल्या आयुष्याशी निगडित घटनांवर काढले जाते. (latest marathi news)
मुलींमध्ये अधिक प्रमाण
टॅटूची क्रेझ विशेष करून महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये अधिक आहे. त्यामध्येही मुलांपेक्षा मुलींमध्ये अधिक प्रमाणात आहे. मुलींमध्ये प्रामुख्याने हात, पाय, नेक, पाठीवर, हाताची बोटे यावर अधिक प्रमाणात काढली जातात. डोळ्यांच्या पापणीवर व डोळ्यांमध्ये सुद्धा सुद्धा टॅटू ड्रॉ केला जातो, मात्र तो अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो.
मुलांमध्येही टॅटू विशेष करून हातावर किंवा छाती अथवा बायसेपवर अधिक प्राधान्य दिले जाते. टॅटू कल्चरमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची ही संधी आहे या माध्यमातून आपण योग्य प्रकारे अर्थार्जन करू शकतो. एक इंचाचा लांबीचा टॅटू काढण्यासाठी चांगल्या दर्जाचा साधारण ४००-५०० रुपये आकारले जातात. त्यासाठी लागणारी टॅटू इंक पिगमेंट ७००-५००० प्रति १०० एमएलसाठी किमतीच्या उपलब्ध आहे.
"टॅटू काढताना एक्स्पर्ट आर्टिस्टकडूनच करावा. जेणेकरून आपल्या त्वचेला इजा होणार नाही. तसेच टॅटू काढण्याचे ठरविल्यानंतर परत पश्चात्ताप होणार नाही व तो काढण्याची वेळ येणार नाही यासाठी मनाशी निश्चय करूनच टॅटू काढावा. टॅटू काढताना नीडल नवीन आहे की नाही हे आपण तपासून घ्यावे." - चित्रा संधान, बीमार्क्स टॅटू स्टुडिओ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.