Congress leader Rahul Gandhi while interacting with the attendees at the Chowk meeting in front of the super market in Malegaon esakal
नाशिक

Nashik Rahul Gandhi Road Show: देशातील मुळ समस्यांचे उच्चाटन करुन सामान्यांना न्याय देवू : राहुल गांधी

Political News : निवडणुकीनंतर संविधान संपुष्टात आणण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (ता. १३) येथील चौकसभेत बोलतांना केला

प्रमोद सावंत

मालेगाव : देशात प्रामुख्याने बेरोजगारी, महागाई व पुंजीपतींची भागिदारी या तीन खरे प्रश्‍न व समस्या आहेत. मोदी काळात प्रश्‍न विचारु नये असा शिरस्ता झाला आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर या तीन मुळ समस्यांचे उच्चाटन करु. शेतकरी, गरीब, कामगार, मजूूर व सामान्यांना न्याय देवू. बेरोजगारी हटविण्यासाठी ३० लाख नोकऱ्या देण्यात येतील.

मनरेगा योजनेतील खात्रीच्या रोजगाराप्रमाणे पहिली नोकरी पक्की ही योजना राबवून तरुणांना एक लाख रुपये व एक वर्षे प्रशिक्षण देण्यात येईल असे आश्‍वासन देतांनाच निवडणुकीनंतर संविधान संपुष्टात आणण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (ता. १३) येथील चौकसभेत बोलतांना केला. (Nashik Bharat jodo nyay yatra rahul gandhi at malegaon marathi news)

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान धुळे येथून त्यांचे येथे आगमन झाले. झोडगे व चाळीसगाव फाटा येथे फटाक्यांच्या आतीषबाजीत स्वागत झाल्यानंतर दरेगाव नाक्यापासून त्यांचा उघड्या जीपमधून रोडशो सुरु झाला. याच दरम्यान सुपर मार्केट समोर झालेल्या चौकसभेत त्यांनी जीपच्या टपावर बसून पंधरा मिनिटे शहरवासियांशी संवाद साधला.

राहुल गांधी म्हणाले, देशात कट्टरपंथी व राजकीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नफरत पसरवण्याचे काम करीत आहेत. धर्मा-धर्मात, जाती-जातीत, भाषे-भाषेत, भावा-भावात व राज्या-राज्यांमध्ये वाद निर्माण केले जात आहेत. नफरतचा हा बाजार बंद करुन सामान्यांसाठी मोहब्बत की दुकान सुरु करतानाच न्याय यात्रा काढण्यात आली आहे. नोटबंदी, जीएसटीने सामान्य नागरिकांना धुळीस मिळविले. रोजगार देणारे लघु उद्योग मोदीने देशोधडीला लावून पुंजीपतींची घरे भरली. यामुळे बेरोजगारी वाढली.

देशातील ७० कोटी देशवासियांकडे जेवढे धन आहे तेवढे धन २२ उद्योगपतींकडे आहे. त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. २० उद्योगपतींना १६ लाख कोटी रुपये कर्जमाफ केले. याउलट शेतकरी व सामान्यांना कर्जमाफी दिली नाही, मेक इन अदानी झाले, मेक इन अंबानी झाले, मेक इन इंडिया झालेच नाही.

इंडिया आघाडी तरुणांना सोशल सिक्युरीटी देईल, महिलांच्या खात्यावर एक लाख रुपये जमा करु, वीज दर नियंत्रीत ठेवू, पेपर लिकला आळा घालण्यासाठी सरकारी संस्थांमार्फत नोकरभरती करुन आऊट सोर्सिंग बंद करु, पेपर लिक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करु, देशात सध्या तरुणांकडे पदवी आहे, मात्र रोजगार नाही.

या सर्व समस्यांपासून लक्ष विचलीत करण्यासाठी मोदी वेगवेगळे डाव टाकतात. आगामी निवडणुकीनंतर संविधान संपुष्टात आणण्याचा त्यांचा डाव आहे, आम्ही संविधानाला हात लावू देणार नाही, इंडिया आघाडी तुमच्या स्वप्नांची पुर्ती करण्याची गॅरंटी व वॉरंटीही देत आहे. ही गॅरंटी मोदीची गॅरंटी नाही. यावेळी जीपमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, महानगर जिल्हाध्यक्ष एजाज बेग आदी होते.

चौकसभेत बोलतांना राहुल गांधी यांनी तस्लीम नामक नऊ वर्षीय मुलाला सभास्थानी बोलाविले. त्यांच्या स्वागतासाठी न्यु एरा इंग्लिश स्कुलच्या कराटे खेळणाऱ्या विद्यार्थीनी कराटेच्या वेशात आल्या होत्या. त्या दुर अंतरावर गाडीवर उभ्या होत्या. त्यांच्याकडे लक्ष गेल्यानंतर या तरुणींनाही सभास्थानाजवळ बोलवतांना दोघा तरुणींना त्यांनी जीपच्या टपावर बसवून घेतले. तस्लीमकडून मोदी उद्योगपतींचे कर्ज माफ करु शकतो तर आम्हीही सामान्यांचे कर्ज माफ करु असे त्यांच्या पाठोपाठ वदवून घेतले. संवादा दरम्यान त्यांनी उपस्थितांशी आप क्या कहते हो असे म्हणत अनेकांची मने जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT